पीएनबीने ईशान्य भारतात आयोजित Mega Credit Camp मध्ये १७९१ कोटी रुपयांच्या कर्जाला दिली मंजुरी

बीटीआरमध्ये आर्थिक आणि औद्योगिक उपक्रमांच्या संधींबद्दल बोलताना त्यांनी परिषदेने घेतलेल्या नवीन पावलांवरही प्रकाश टाकला.

  • मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा सरमा यांनी पीएनबी आणि आसाम बायो रिफायनरी यांच्यातील कराराच्या निमित्ताने केले बँकेचे कौतुक

मुंबई : आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा सरमा (Assam Chief Minister Dr. Hemant Biswa Sarma) यांनी आज पंजाब नॅशनल बँके (पीएनबी) आपल्या राज्यातील लोकांना बँकिंग सुविधा  पुरवल्याबद्दल कौतुक केले. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आयोजित मेगा क्रेडिट शिबिरांच्या पार्श्वभूमीवर पीएनबीने (PNB) आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.सरमा यांनी बँकेच्या सेवा गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले. कर्जाची परतफेड (Loan Repayment) करण्याची सवय अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यात स्पष्ट शब्दात बँकिंगची मूलभूत माहिती स्पष्ट केली.

यावेळी बोलताना, प्रमोद बोरो, बोडोलँड टेरिटोरियल रीजन (बीटीआर) चे माननीय मुख्य कार्यकारी सदस्य. पीएनबी आणि आसाम बायो रिफायनरी यांचे महत्त्वपूर्ण सामंजस्य करारा वर स्वाक्षरी केल्याबद्दल अभिनंदन केले . बीटीआरमध्ये आर्थिक आणि औद्योगिक उपक्रमांच्या संधींबद्दल बोलताना त्यांनी परिषदेने घेतलेल्या नवीन पावलांवरही प्रकाश टाकला.

यावेळी बोलताना, पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सीएच एस एस मल्लिकार्जुन राव यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेच्या सेवेसाठी वचनबद्धतेचे आश्वासन दिले.

नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) एस. के . बरुआ आसाम बायो रिफायनरी निर्माण करण्याचा प्रवास सांगत आहेत हजारो बांबू उत्पादकांची उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी आणि राज्याच्या जैवइंधन निर्मितीच्या स्वप्नासह राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याबाबत त्यांनी माहिती दिली.