‘पीएनजी ज्वेलर्स’चा बहुचर्चित मंगळसूत्र महोत्सव सुरू

आगामी उत्सव काळाचा जोरदार प्रारंभ करताना,१८७ देदीप्यमान वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे सर्वांनाच दीर्घकाळ प्रतिक्षा असलेल्या बहुचर्चित ‘मंगळसूत्र महोत्सवा’ची घोषणा नुकतीच करण्यात आली.

पुणे : आगामी उत्सव काळाचा जोरदार प्रारंभ करताना,१८७ देदीप्यमान वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे सर्वांनाच दीर्घकाळ प्रतिक्षा असलेल्या बहुचर्चित ‘मंगळसूत्र महोत्सवा’ची घोषणा नुकतीच करण्यात आली. विविध सणांच्या निमित्ताने ‘मंगळसूत्र महोत्सवा’ची घोषणा करून ‘पीएनजी ज्वेलर्स’ यांनी अनेक उत्सवांचा समावेश असलेल्या ‘प्युअर इमोशन श्रावण’ या उपक्रमाने सुरुवात केली आहे. हा ‘मंगळसूत्र महोत्सव’ २४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

सुमारे महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाच्या कालावधीत ग्राहकांसाठी विविध डिझाईनच्या मंगळसूत्रांची विस्तृत श्रेणी ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे सादर करण्यात आली आहे. या कालावधीत सोन्याच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकेल. तसेच डायमंड पेंडंट्स असलेल्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत मिळणार आहे.

विवाहित भारतीय महिलांसाठी ‘मंगळसूत्र’ हा एक पारंपरिक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा आणि तितकाच आधुनिक अलंकार आहे. यंदाच्या मंगळसूत्र महोत्सवात अगदी कमी वजनाच्या नाजूक व आधुनिक काळातील मंगळसूत्रापासून ते पारंपरिक वजनदार मंगळसूत्रांच्या विविध डिझाईनच्या विस्तृत श्रेणी ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे सादर करण्यात आल्या आहेत.

‘मंगळसूत्र महोत्सव’ हा ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या देशभरातील संपूर्ण दालनांमध्ये दरवर्षी नियमितपणे साजरा करण्यात येणारा सोहळा असून या निमित्ताने सर्व स्तरांमधील ग्राहक ‘पीएनजी ज्वेलर्स’कडे आकर्षित होतात. तसेच, या महोत्सवा दरम्यान ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद हा उस्फूर्त असतो. ‘मंगळसूत्र महोत्सवा’ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही यंदाच्या वर्षी विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण मंगळसूत्रांची डिझाईन्स सादर करण्यात आल्या आहेत. या डिझाईन्स ग्राहकांचे पुरेपूर समाधान करतील. तसेच त्यांना या डिझाईन्स पसंत पडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो अशी माहिती ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली.