Punjab National Bank contributes to the Armed Forces Flag Day fund
पंजाब नॅशनल बँकेने सशस्त्र सेना ध्वज दिनी दिले निधीमध्ये योगदान

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी माजी सैनिक, त्यांचे कुटुंब आणि अनाथ यांच्या पुनर्वसन, विवाह आणि शिक्षणासाठी अनेक कल्याणकारी योजना चालविण्यासाठी वापरला जातो. यावर्षी ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन हा "गर्व महिना" म्हणून साजरा केला जात आहे.

  • ७डिसेंबर रोजी सशस्त्र सैन्य ध्वज दिनानिमित्त सैनिकांच्या सन्मानार्थ भारतीय संरक्षण दलाचा सन्मान

मुंबई : देशातील अग्रगण्य बँक, पंजाब नॅशनल बँकने शनिवारी आपले कर्तव्य निभावत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी ( AFFDF ) मध्ये युद्ध विधवा आणि शूर सैनिकांच्या मुलांच्या कल्याणसाठी तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय आणि आश्रित मुलांच्या कल्याणाकरता योगदानाची घोषणा केली. पीएनबीचे चीफ जनरल मॅनेजर श्री. विवेक झा यांनी एअर कमांडर बी. अहलुवालिया, व्हीएसएम यांना धनादेश दिला.

पीएनबी कॅन्टोन्मेंट भागात त्याच्या ११८ शाखांद्वारे समर्पित आणि सर्वोच्च पातळीवर अखंडतेसह आमच्या सशस्त्र दलाची सेवा देत आहे. सशस्त्र सेना ध्वज दिन निधी माजी सैनिक, त्यांचे कुटुंब आणि अनाथ यांच्या पुनर्वसन, विवाह आणि शिक्षणासाठी अनेक कल्याणकारी योजना चालविण्यासाठी वापरला जातो. यावर्षी ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन हा “गर्व महिना” म्हणून साजरा केला जात आहे.

केंद्रीय सैनिक बोर्ड ही ११० वर्षांची संस्था आहे, सर्वोच्च संस्था माननीय संरक्षणमंत्री (एमओडी) च्या अध्यक्षतेखाली आहे. जे सुमारे ३७ लाख माजी सैनिकांच्या कल्याणासाठी काम करते. माजी सैनिक, युद्ध विधवा, युद्ध अपघात, अनाथ / आश्रित मुलांचे कल्याण कार्य सशस्त्र सैन्य ध्वजदिन निधीसाठी देणगीदारांच्या निधीतून देण्यात आलेल्या योजनांच्या माध्यमातून केएसबीद्वारे पूर्ण केले जाते.