Punjab National Bank introduces PNB e-credit card nrvb
पंजाब नॅशनल बँकेने पीएनबी ई-क्रेडिट कार्ड सादर केले

कार्ड प्रत्यक्षरित्या न घेता, पीएनबी ग्राहकांना कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किंवा मर्चट वेबसाइटवर पीएनबी ई-क्रेडिट कार्ड वापरण्याची सोय होईल.

मुंबई : देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने आज पीएनबी ई-क्रेडिट कार्ड, फिजिकल क्रेडिट कार्डची डिजिटल प्रतिकृती आणली.

कार्ड प्रत्यक्षरित्या न घेता, पीएनबी ग्राहकांना कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किंवा मर्चट वेबसाइटवर पीएनबी ई-क्रेडिट कार्ड वापरण्याची सोय होईल.

पीएनबी जिनी मोबाइल अ‍ॅपमधील ई-क्रेडिट कार्ड सुविधेवर क्लिक करून ग्राहक पीएनबी ई-क्रेडिट कार्डची तपशील पाहू शकतात.

विद्यमान पीएनबी ग्राहकांना नवीन सुविधेचा उपयोग करण्यासाठी त्यांना गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वर उपलब्ध नवीन अ‍ॅपने पीएनबी जिनी अ‍ॅपला अपडेट करणे आवश्यक आहे.

पीएनबी जिनी अ‍ॅप ग्राहकांना आंतरराष्ट्रीय / घरगुती वापरासाठी कार्ड सक्रिय करण्यास आणि एटीएम, ईकॉमर्स, पीओएस आणि पेमेंट भरण्यासाठीसाठी व्यवहार मर्यादा निश्चित करण्यास मदत करते.