पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहकांना नववर्षाचे गिफ्ट ‘पीएनबी न्यू इयर बोनांझा-२०२१ ‘ फेस्टिवल ऑफर

या ऑफरअंतर्गत होम लोन, कार लोन यांवर प्रोसेसिंग चार्ज किंवा डॉक्युमेंट चार्ज आकारणार नाही . ग्राहक या ऑफरचा फायदा पीएनबीच्या देशातील कोणत्याही शाखेतून किंवा डिजिटल प्लाटफॉर्मव्दारे घेऊ शकतात.

मुंबई : देशातील दुसरी मोठी सरकारी बँक अर्थात पंजाब नॅशनल बँकेने नवीन वर्षात स्वताचे घर किंवा कार खरेदी करण्यासाठी ‘ फेस्टिवल बोनांझा ऑफर ‘ ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली असून आता या ऑफरला ‘पीएनबी न्यू इयर बोनांझा -२०२१ ‘ असे नाव देण्यात आले आहे.

या ऑफरअंतर्गत होम लोन, कार लोन यांवर प्रोसेसिंग चार्ज किंवा डॉक्युमेंट चार्ज आकारणार नाही . ग्राहक या ऑफरचा फायदा पीएनबीच्या देशातील कोणत्याही शाखेतून किंवा डिजिटल प्लाटफॉर्मव्दारे घेऊ शकतात. नवीन किंवा टेकओव्हर लोन घेतल्यास प्रोसेसिंग फी कमी करण्यात आली आहे.