उद्यापासून ATM मधून पैसे काढणं, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर महागणार; किती असेल शुल्क?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे. हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

    नवी दिल्ली:  तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर यावरील शुल्कासंदर्भात आरबीआयकडून (RBI) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करत आहे.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे. हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

    आरबीआयच्या मते, इंटरचेंज शुल्क ग्राहकाने क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास मर्चंट बँकेला लागू होतात.

    काय आहे इंटरजेंज शुल्क?

    जेव्हा एखादा ग्राहक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करतो, तेव्हा हे पेमेंट प्रोसेस करणाऱ्या मर्चेंटच्या बँक खात्यातून ट्रान्झॅक्शन फी घेतली जाते.