रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील ‘या’ बँकेवर केली कारवाई, ठोठावला २ लाखांचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) मुंबईतील सर्वोदय सहकारी बँकेवर (Sarvodaya Co-operative Bank) दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

    मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) मुंबईतील सर्वोदय सहकारी बँकेवर (Sarvodaya Co-operative Bank) दोन लाखांचा दंड(Fine) ठोठावला आहे. केवायसी नियमांचे पालन न केल्याने बँकेवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. आरबीआयने हा दंड बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ च्या सेक्शन ४७ ए (१) (सी) अंतर्गत ठोठावला आहे.

    आरबीआयने ६ सप्टेंबर २०२१ च्या एका आदेशाद्वारे सर्वोदय सहकारी बँक लिमिटेड, भांडूप (पश्चिम), मुंबई या बँकेवर जारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि अनुपालन न केल्याने २ लाखांचा मॉनेटरी दंड ठोठावला आहे.याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील बाँबे मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५० लाखांचा दंड ठोठावला होता.

    आरबीआयन स्पष्ट केले आहे की, बँकावर ही कारवाई Regulatory compliance मध्ये कमतरता असल्यामुळे करण्यात आली आहे. ग्राहकांच्या कोणत्याही व्यवहारावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. RBI ने काही नियम किंवा तरतुदींचे पालन न केल्याने किंवा नियमांचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावला आला आहे. त्यामुळे याचा ग्राहकांवर काही परिणाम होणार नाही.