sensex

शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स(Sensex) ५८ हजारांचा पल्ला पार केला आहे. आज सकाळच्या सत्रात २१७ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

    भारतीय शेअर बाजारात(Share Market) सध्या चांगले वातावरण आहे. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स(Sensex) ५८ हजारांचा पल्ला पार केला आहे. आज सकाळच्या सत्रात २१७ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स ५८,०६९ वर पोहोचला आहे. निफ्टीत ६६.२० अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी(Nifty) १७,३०० अंकांवर पोहोचला होता.

    जागतिक बाजारातील चांगल्या उलाढालीमुळे शेअर बाजार तेजीत आहे. अमेरिकेच्या बाजारातून चांगले संकेत, देशातील कोरोना रुग्णांमधील घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीम याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले. आज रिलायन्स, जस्ट डायल, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, व्होडाफोन आयडिया, अदाणी ग्रीन, पीएनबी आणि कोल इंडिया या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा कल दिसत आहे. आज बीएसईवर लिस्टेड असलेल्या एशियन वेगप्रो इंटस्ट्रीज, प्राईम फोकस आणि राजश्री शुगर्स अँड केमिकल्सचे आर्थिक परिणाम येतील.

    गुरुवारी शेअर बाजारात दिवसभराच्या उलाढालीनंतर तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स ५१४.३३ अंकासह ५७,८५२.५४ अंकांवर बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १५७.९० अंकांसह १७.२३४.१५ अंकांवर बंद झाला होता.