एसआयपीतून विक्रमी ओघ; ‘इक्विटी’ फंडांना ओहोटी

विक्रमी शिखराला पोहोचलेल्या भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाचा लाभ नफावसुलीद्वारे मिळवण्याचा गुंतवणूकदारांनी प्रयत्न केल्याचे ‘अ‍ॅम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारीमधील ३०.५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत फेब्रुवारी २०२१ अखेर एकूण फंड मालमत्ता ३१.६४ लाख कोटी रुपये झाली आहे.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दिल्ली.

    भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक दिवसागणिक तेजी नोंदवत असले तरी समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची रक्कम काढून घेण्याची प्रक्रिया आठव्या महिन्यातही कायम राहिली आहे. या फंड पर्यायातून गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये १०,४६८ कोटी रुपये काढून घेतले.

    विक्रमी शिखराला पोहोचलेल्या भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाचा लाभ नफावसुलीद्वारे मिळवण्याचा गुंतवणूकदारांनी प्रयत्न केल्याचे ‘अ‍ॅम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारीमधील ३०.५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत फेब्रुवारी २०२१ अखेर एकूण फंड मालमत्ता ३१.६४ लाख कोटी रुपये झाली आहे.

    समभाग संलग्न फंडांच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात रोखेसंलग्न (डेट) फंडांमध्ये १,७३५ कोटी रुपये गुंतवले. आधीच्या महिन्यात या फंड प्रकारातून ३३,४०९ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते तर समभागसंलग्न फंडातून गेलेल्या रकमेचा यंदाच्या फेब्रुवारीतील तीन महिन्यांचा उच्चांक आहे. जानेवारीत या माध्यमातून ९,२५३ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.