रिबॉकने आपला वॉकिंग पोर्टफोलिओ बनवला आणखी दमदार; लोकांना केले ‘स्टँड अप, मूव्ह मोअर, बी फीट’चे आवाहन

गेल्या काही वर्षांमध्ये लोकांनी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालण्याचा व्यायाम सुरू केला असल्याचे रिबॉकला आढळून आले आहे. लोकांमधील हाच कल लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन देण्यासाठी व लोकांनी चालणे सुरू करावे यासाठी रीबॉकच्या या नव्या कलेक्शनला अधिक चांगला दर्जा, आरामदायी रचना आणि तंत्रज्ञान तसेच वाजवी किंमत या वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे.

  नवी दिल्ली : आपल्या सर्व ग्राहकांसाठी फिटनेस ही एक स्वत:हून निवडलेली जीवनशैली बनून जावी या हेतूशी असलेली आपली बांधिलकी जपत भारताचा फिटनेस ब्रँड रीबॉकने (Reebok) आपल्या वॉकिंग फुटवेअर (Walking Footware) श्रेणीमध्ये काही नव्या स्टाइल्स आणल्या आहेत. चालताना पायांना जास्तीत-जास्त आराम आणि आधार मिळावा यासाठी श्रेणीमध्ये पुरुष व स्त्रियांसाठी तांत्रिक सुधारणा असलेल्या काही नव्या उत्पादनांची भर टाकण्यात आली आहे. आपल्या ग्राहकांचा फिटनेस पार्टनर बनण्यासाठी आणि दैनंदिन आयुष्यामध्ये फिटनेसचे महत्त्व नव्याने प्रस्थापित करण्यासाठी आपली बांधिलकी ठळकपणे मांडण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे.

  गेल्या काही वर्षांमध्ये लोकांनी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालण्याचा व्यायाम सुरू केला असल्याचे रिबॉकला आढळून आले आहे. लोकांमधील हाच कल लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन देण्यासाठी व लोकांनी चालणे सुरू करावे यासाठी रीबॉकच्या या नव्या कलेक्शनला अधिक चांगला दर्जा, आरामदायी रचना आणि तंत्रज्ञान तसेच वाजवी किंमत या वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे. रीबॉक डेलीफिट डीएमएक्स, एव्हर रोड डीएमएक्स ४.०, एव्हर रोड डीएमएक्स स्लिप ऑन, वॉल्क वे कम्फी २.० आणि द्रुहान अशा नावांच्या या नवीन उत्पादनांमुळे रीबॉकचे वॉकिंग श्रेणीतील स्थान अधिक भक्कम होणार आहे.

  या श्रेणीमध्ये रीबॉक वॉकिंग शूजचे खास वैशिष्ट्य असलेल्या डीएमएक्स मूव्हींग एअर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये शूजच्या मिडसोल्समध्ये हवेच्या हालचालीला जागा मिळते व त्यामुळे टाचांपासून ते पायांच्या बोटांपर्यंत सर्वत्र नैसर्गिक कुशनिंग तयार होते. अशी रचना चालण्याचा आरामदायी अनुभव मिळवून देते. नवीन डेलीफिट डीएमएक्स शूज प्रगत आणि अत्याधुनिक डीएमएक्स ट्रिपल एअर मूव्हिंग टेक्नोलॉजीने सुसज्ज आहेत. या तंत्रज्ञानामुळे पावलाच्या कमानीला अधिक आधार मिळत असल्याने हे शूज दिवसभरही आरामात वापरता येतात.

  याशिवाय रीबॉकने पुरस्कार विजेत्या डेलीफिट डीएमएक्स वॉकिंग शूजचे काही नवीन उठावदार रंगही पहिल्यांदाच या श्रेणीत आणले आहेत. डेलीफिट डीएमएक्स आजही स्त्रियांना वैविध्यपूर्ण आणि वाजवी किंमतीच्या वॉकिंग शूजचे अनेक पर्याय देऊ करतात, जेणकरून त्यांना एक एक्टिव्ह आयुष्य जगता यावे. नवीन डेलीफिट डीएमएक्समध्ये पांढरा/काळा/गुलाबी टाय-डाय/राखाडी असे रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

  या वॉकिंग रेंजबद्दल सांगताना रीबॉकची ब्रँड ॲम्बेसेडर कतरिना कैफ सांगते, “माझे रीबॉकशी अनेक वर्षांपासूनचे नाते आहे आणि या ब्रँडच्या आणखी एका लक्ष्यवेधी जाहिरात मोहिमेचा भाग झाल्याचा मला अतिशय आनंद आहे. आपल्या वॉकिंग श्रेणीमध्ये नवीन स्टाइल्स घेऊन येत रीबॉकने फिटनेसशी असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे आणि चालण्यासारखा एक साधा व्यायाम किती मोठा बदल घडवून आणू शकतो हे याकडे लक्ष वेधले आहे. हे शूज अधिक वाजवी दरात उपलब्ध करून देतानाच त्यांचा आरामशीरपणा, दर्जा आणि टिकाऊपण तसेच राखण्यात आल्याने देशभरातील अधिकाधिक लोकांना अधिक तंदुरुस्त आणि चांगली जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.”

  नव्या वॉकिंग श्रेणीमधून बाजारात दाखल होत असलेली काही उत्पादने पुढीलप्रमाणे :

  • डेलिफिट डीएमएक्स – रु. ६,५९९
  • एव्हर रोड डीएमएक्स ४.० – रु. ५,९९९
  • एव्हर रोड डीएमएक्स ऑन ४ – रु. ५,५९९
  • वॉक-वे कम्फी २.० – रु. ४५९९ लवकरच दाखल होणार
  • द्रुहान – रु. ३९९९ लवकरच दाखल होणार

  ही नवीन वॉकिंग श्रेणी आता पुरुष व स्त्रियांच्या मापांमध्ये shop4reebok.com या संकेतस्थळावर आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, एजिओ, मिन्त्रा आणि टाटाक्लिक येथेही या नव्या वॉकिंग स्टाइल्सची विस्तृत श्रेणी पाहता येईल. या नव्या वॉकिंग रेंजमधील द्रुहान सप्टेंबरच्या मध्यावर तर वॉक-वे कम्फी २.० हे शूज ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजारात दाखल होतील.
  अधिक माहितीसाठी कृपया आमच्या @reebokindia या इन्स्टाग्राम हॅण्डलला भेट द्या.