Reliance General Insurance Introduces Insurance Gift Card
रिलायन्स जनरल इन्शुरन्स सादर करत आहेत अभूतपूर्व सेवा - 'इन्शुरन्स गिफ्टकार्ड'

  • 'इन्शुरन्स' भेट देण्याची अधिक स्मार्ट आणि अभूतपूर्व संधी

मुंबई : रिलायन्स जनरल इन्शुरन्स (Reliance General Insurance) या रिलायन्स कॅपिटलच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने ‘इन्शुरन्स गिफ्टकार्ड’ (Insurance Giftcard) हे अभूतपूर्व उत्पादन सादर केले आहे. यामुळे ‘इन्शुरन्स’ भेट देण्याची अधिक अभूतपूर्व संधी उपलब्ध होणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) च्या मार्गदर्शक तत्वांअंतर्गत सुयोग्य आणि नाविन्यपूर्ण उत्पादने देणाऱ्या काही मोजक्या सेवांमध्ये हे उत्पादन समाविष्ट आहे. भारतात (India) सणासुदीच्या काळात (festival season) भेट वस्तू (gifts) देण्याची मानसिकता लक्षात घेऊन हे उत्पादन खास तयार करण्यात आले आहे. विकत घेण्यास आणि भेट देण्यास हे अगदी सहजसोपे असे आहे. ‘इन्शुरन्स गिफ्ट कार्ड’ हे कोणत्याही अन्य प्रीपेड कार्डप्रमाणे असलेले कार्ड ५०० ₹ आणि १००० ₹  या किमतीत उपलब्ध आहे. हे कार्ड reliancegeneral.co.in या वेबसाइटवरून तात्काळ खरेदी करता येईल.

‘गिफ्ट कार्ड’ ऑनलाइन खरेदी केल्याबरोबर तुम्हाला ईमेलवर वाऊचरसोबतच हे वाऊचर वापरण्यासंदर्भातील सूचना पाठवल्या जातील. त्यानंतर ज्या व्यक्तीला ही भेट द्यायची आहे त्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अगदी सहज हे कार्ड देता येईल आणि कार्डधारकाला आरोग्य विमा संरक्षण विकत घेता येईल. कार्डधारक किंवा स्वत:लाही कोणत्याही वैयक्तिक उत्पादनासाठी१० टक्के सवलत देण्यात येत आहे. हा व्यवहार पूर्णपणे डिजीटली होणार असल्याने ग्राहकांना सोयही मिळते आणि पारदर्शकताही. खरेदीनंतर सहा महिने हे गिफ्ट कार्ड वापरता येईल तसेच वापरले न गेल्यास पैसे परत मिळतील.

या सादरीकरणाबद्दल रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश जैन म्हणाले, “भारतात भेट देणे म्हणजे आशीर्वाद देण्यासारखे आहे. सण किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी छोटीशी भेट देणे म्हणजे प्रियजनांप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याचे एक प्रतिक असते. यंदा हे महासंकट आसपास असताना लोकांना आपल्या मित्रमंडळींच्या, कुटुंबियांच्या आरोग्याची चिंता आहे. त्यामुळे, आरोग्यविमा संरक्षणापेक्षा चांगली भेट काय असेल. या इन्शुरन्स गिफ्टकार्डच्या माध्यमातून काढलेलाआरोग्यविमा त्यांच्या वैद्यकीय आपातकालीन स्थितीची काळजी घेईल आणि त्यामुळे गरजेला ही भेट फारच उपयुक्त ठरेल.

“देश आता हळूहळू ‘न्यू नॉर्मल’सह पूर्वपदावर येत आहे. दसरा, दिवाळी, लग्नसराई सोबत आपण उत्सावांच्या मूडमध्ये आहोत. त्यामुळे या काळात भेट देण्यासाठी ‘इन्शुरन्स गिफ्टकार्ड’ ही एक स्मार्ट निवड ठरेल.

अधिक माहितीसाठी www.reliancegeneral.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.