Reliance General Insurance unveils new brand mascot Brobot
रिलायन्स जनरल इन्शुरन्स’च्या वतीने नवीन ब्रँड मॅस्कोट 'ब्रोबोट' (Brobot)चे अनावरण

रिलायन्स जनरल इन्शुरन्स(RGI), ही रिलायन्स कॅपिटल (RC) ची 100% उपकंपनी असून त्यांच्या नवीन ब्रँड मॅस्कोट “ब्रोबोट”सह नवीन ब्रँड कॅम्पेन टेक + हार्ट’चे अनावरण करण्यात आले. या कॅम्पेनचे उद्दिष्ट हे रिलायन्स जनरल इन्शुरन्सला नवीन युगाचा जनरल इन्शुरन्स ब्रँड म्हणून जागा मिळवून देण्याचे आहे.

मुंबई : रिलायन्स जनरल इन्शुरन्स (RGI), ही रिलायन्स कॅपिटलची 100% उपकंपनी असून त्यांच्या नवीन ब्रँड मॅस्कोट “ब्रोबोट”सह नवीन ब्रँड कॅम्पेन टेक + हार्ट’चे अनावरण करण्यात आले. या कॅम्पेनचे उद्दिष्ट हे रिलायन्स जनरल इन्शुरन्सला नवीन युगाचा जनरल इन्शुरन्स ब्रँड म्हणून जागा मिळवून देण्याचे आहे.

याद्वारे ग्राहकांना तंत्रज्ञान सुलभता देऊ करण्यात येईल, सोबतच मानवी हृदयात सामावलेली सहानुभूती देऊ करण्यात येणार आहे. हे उत्पादन लिव्हस्मार्ट तत्वज्ञानावर आधारलेले आहे.

या मल्टीमीडिया कॅम्पेनच्या माध्यमातून रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे ध्येय हे एक डिजीटल प्लेअरच्या पलीकडे जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांना तंत्रज्ञान-आधारीत पर्याय उपलब्ध करून सुलभ पॉलिसी इन्शुरन्स, नूतनीकरण आणि दाव्याकरिता साह्य करण्याचे आहे. सोबतच दर्जेदार सहानुभूती आणि देखभाल सेवेची खातरजमा या उत्पादनाद्वारे करण्यात येते. ब्रँड मॅस्कोटसोबतच हे कॅम्पेनब्रँड नीतिचे सादरीकरण करते. ग्राहकांना प्राधान्य देण्यासोबत ग्राहक प्रवासाच्या प्रत्येक पायरीवर सोपा सेवा अनुभव ही कॅम्पेन ब्रँड निती आहे. हे कॅम्पेन वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना आवडेल, कारण यातील संदेश अतिशय समर्पक आणि सहज आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या लाँचविषयी बोलताना रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे ईडी आणि सीईओ राकेश जैन म्हणाले की, “आजच्या घडीला जनरल इन्शुरन्स उद्योगक्षेत्र झपाट्याने वाढणाऱ्या डिजीटायजेशनच्या अग्रभागी असून या क्षेत्राचे ध्येय ग्राहक अनुभव सुलभ करून देण्याकडे आहे. तसेच ग्राहकांना अविरत पाठबळ आणि साह्य देण्याचे आहे. आम्ही आरजीआय’मध्ये कायमच डिजीटायजेशनवर भर देतो. कोरोना विषाणू महासाथीने आमच्याकरिता या प्रक्रियेला अधिक वेग मिळाला. तरीच, आम्हाला एक जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून तांत्रिक व्यत्ययाची जाणीव आहे. तंत्रज्ञानासोबत मानवी मूल्यांची सरमिसळ होणे आवश्यक असून आमचा कल नेहमीच ग्राहक-केंद्री राहण्याचा आहे. त्यामुळे आमच्याब्रँड कॅम्पेनसह आमचा नवीन मॅस्कोट ‘ब्रोबोटमध्ये ही ब्रँड नीती रुजवायची आहे. न्यू नॉर्मल स्थितीत आमच्या ग्राहकांसमोर ताज्या दृष्टिकोनासह इन्शुरन्स सादर करायचा आहे”