रिलायन्स जनरल इन्शुरन्स आता मायक्रोसॉफ्ट अझुरे एआयच्या माध्यमातून सज्ज, वेगावन व्हेईकल क्लेम्स पर्याय देऊन ग्राहकांना करणार सक्षम

'रॅपिड'मुळे दाव्याचे इंटिमेशन ते सेटलमेंट कालावधी ही संपूर्ण प्रक्रिया तासाभराहून कमी वेळात पूर्ण होते. एरवी ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कटकटीची असते. काहीवेळा तर या प्रक्रियेला १० ते १२ दिवसही लागतात.

मुंबई : रिलायन्स जनरल इन्शुरन्स (आरजीआय) या रिलायन्स कॅपिटलच्या (Reliance capital) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आपल्या व्हेईकल क्लेम ( Accelerated Vehicle Claims) प्रक्रियेला अधिक वेग देत ‘रॅपिड’हा नवा पर्याय सादर केला आहे. मायक्रोसॉफ्ट अझुरे  ( Microsoft Azure AI ) कॉग्निटिव्ह सर्विसेस आणि अझुरे मशिन लर्निंग क्षमतांनी युक्त अशी ही इमेज ॲनालिटिक्सने सज्ज प्रणाली आहे. या एंड-टू-एंड पर्यायामुळे आरजीआयला आपल्या ग्राहकांना विम्याचा क्लेम करताना अधिक वेगवान आणि सहजसोपा अनुभव देणे शक्य होणार आहे.

भारत ही जगातील एक सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी ऑटो विमा बाजारपेठ आहे. मात्र, ही बाजारपेठ विम्याचे नुतनीकरण आणि रीपेअर क्लेमच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आजही पारंपरिक मार्गांचा अवलंब करते. यात गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी निरिक्षकांची गरज असते. यामुळे परीक्षणाच्या प्रक्रियेला विलंब होतो आणि त्यामुळे गाड्या आणि विमाधारक बराच काळ प्रवासापासून वंचित राहतात. ही आव्हाने कमी करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने सेलेबल टेक्नोलॉजिस या मायक्रोसॉफ्टच्या भागीदारासोबत सहकार्य केले आहे. यातून एक नवा एआय पर्याय मिळणार आहे. ज्यामुळे ग्राकांना कुठूनही, कधीही विमा घेता येईल किंवा त्याचे नुतनीकरण करता येईल.

या नव्या युगातील तंत्रज्ञान गाडीच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गाडीचे किती नुकसान झाले आहे हे ठरवते आणि योग्य विश्लेषण करते. हे विश्लेषण तात्काळ ग्राहकापर्यंत पोहोचते. या प्रक्रियेत अगदी अपघाताच्या स्थळावरून विमाधारक रिलायन्स सेल्फी ॲपचा वापर करून क्लेम करू शकतील, फोटो आणि कागदपत्रे अपलोड करून दाव्याची नोंदणीही करू शकतील. दावा तयार केला गेला की एआय प्रणाली पुढील प्रक्रिया सुरू करते आणि जवळपास तत्काळच ग्राहकासाठी दुरुस्तीच्या कामाची तरतूद केली जाते. यात ग्राहकांना ‘ऑन-द-स्पॉट’ सेटलमेंटचाही पर्याय देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा केले जातात.

‘रॅपिड’मुळे दाव्याचे इंटिमेशन ते सेटलमेंट कालावधी ही संपूर्ण प्रक्रिया तासाभराहून कमी वेळात पूर्ण होते. एरवी ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कटकटीची असते. काहीवेळा तर या प्रक्रियेला १० ते १२ दिवसही लागतात.

या उपक्रमाबद्दल रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश जैन म्हणाले, “एआय आधारित पर्यायामुळे आमच्या ग्राहकांसाठी व्हिइकल क्लेम्सची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि विना कटकटीची झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे आमच्याकडे येणाऱ्या साधारण नुकसान झालेल्या प्रवासी वाहनांमधील ६० टक्क्यांहून अधिक दाव्यांना आवश्यक तो वेग मिळाला आहे. रॅपिडच्या वापरामुळे दाव्याच्या प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे. ज्यामुळे अर्थातच ग्राहक सेवा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. टेक हार्ट या आमच्या ब्रँड तत्वाला अनुसरून या उपक्रमातून तंत्रज्ञानाला मानवी भावनांची जोड देण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या कमर्शिअल पार्टनर्स विभागाचे कार्यकारी संचालक वेंकट कृष्णन म्हणाले, “एआयचे लाभ सर्वांसाठी मौल्यवान आणि सहज उपलब्ध करून देत मानवी चातुर्याला अधिक समृद्ध करणे हे मायक्रोसॉफ्टचे लक्ष्य आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या ग्राहकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजंसची ताकद आणि त्यातील बदलात्मक परिणाम उपलब्ध करून देत या अनुभवाला एक नवे स्वरूप देण्यात त्यांच्याशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. नुतनीकरण आणि दाव्याची प्रक्रिया सुरक्षित आणि व्यापक प्रमाणात निर्माण करण्यासाठी आम्ही आमचे भागीदार सेलेबल टेक्नॉलॉजीसचे आभारी आहोत.