Reliance ची रिटेल आणि होलसेल व्यवसायात दमदार एंट्री; फ्यूचर समूह केला खरेदी

देशातील सर्वाधिक धनाढ्य व्यावसायिक अशी ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मालकी हक्काची (आरआयएल)ची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने शनिवारी फ्यूचर समूहाचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय तसेच लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय २४,७१३ कोटी रुपये एकरकमी देऊन खरेदी केल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक धनाढ्य व्यावसायिक अशी ख्याती असलेल्या मुकेश अंबानी(mukesh ambani) यांच्या मालकी हक्काची (आरआयएल)ची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने शनिवारी फ्यूचर समूहाचा(future group) रिटेल आणि होलसेल(retail and holesale) व्यवसाय तसेच लॉजिस्टिक्स आणि गोदाम (logistics and godown) व्यवसाय २४,७१३ कोटी रुपये एकरकमी देऊन खरेदी केल्याची घोषणा केली.

खरेदी योजने अंतर्गत फ्यूचर समूह आपल्या काही कंपन्या फ्यूचर एंटरप्राइझेस लिमिटेड (एफईएल) मध्ये विलीन करणार आहे असे आरआरव्हीएलने म्हटले आहे. या योजने अंतर्गत फ्यूचर समूहचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय आरआरव्हीएलच्या मलकी हक्काची कंपनी रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाइल लिमिटेड (आरआरएफएलएल) ला हस्तांतरित करणार आहे. याशिवाय लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय आरआरवीएलकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या व्यवहारामुळे रिलायन्स रिटेलचा ताबा घेणार आहे, जी बिग बझारच्या मालकीची आहे आणि वाण सामानापासून ते सौंदर्य प्रसाधने, कपडे अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची विक्री होते. याशिवाय फ्यूचर लाइकस्टाइल फॅशनचीही खरेदी करण्यात येणार आहे.

तसं पाहिलं तर, फ्यूचर समूहाचा अर्थ आणि विमा व्यवसाय या व्यवहाराचा भाग नाही. अंबानी यांच्या कंपनीने फ्यूचर रिटेल आणि फ्यूचर लाइफस्टाइल फॅशनचे पूर्णपणे भागभांडवल विकत घेतले आहे. पण, भविष्यात अमेझॉनच्या भागीदारीचे काय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सिएटल स्थित अमेझॉनने फ्यूचर कूपन्स लिमिटेडचे ४९ टक्के भागभांडवल विकत घेऊन फ्यूचर रिटेलमध्ये अप्रत्यक्षपणे १.३ टक्के भागभांडवल खरेदी केले होते. अमेझॉनची फ्यूचर रिटेल स्टोरसाठी अधिकृत ऑनलाइन विक्री चॅनल म्हणून घोषणा झाल्यानंतर या भागीदारीत यावर्षी जानेवारीत आणखी वाढ झाली. रिलायन्सला फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेडच्या अल्पसंख्याक भागधारकांकडून २६ टक्के भागभांडवल घेण्यासाठी ओपन ऑफर करावी लागण्याची शक्यता आहे.

भारतातील रिटेल सेक्टरमध्ये स्पर्धा होणार तीव्र

किशोर बियाणी यांच्या नेतृत्वात फ्यूचर ग्रुपने शेअर बाजाराला दिलेल्या ब्रिफिंगमध्ये या कराराला दुजोरा दिला आहे. फ्यूचर रिटेल १,५५० स्टोअर्स चालविते आणि बिग बाजार, एफबीबी, फूडहॉल, ईझीडे, हेरिटेज फ्रेश आणि डब्ल्यूएचई स्मिथ हे प्रमुख ब्रँड्स आहेत. फ्यूचर लाइफस्टाईल फॅशनचे ३५४ स्टोअर चालवते. रिलायन्स आणि फ्यूचर रिटेलमधील हा करार भारताच्या रिटेल क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र करेल. येथे अमेझॉनने ५.५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आधीच आश्वासन दिले आहे, तर वॉलमार्टने २०१८ मध्ये १६ अब्ज डॉलर्समध्ये ई-कॉमर्स दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट विकत घेतली आहे.

प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसार, विलीनीकरणानंतर एफईएलमध्ये ६.०९ टक्के इक्विटी शेअर्स घेण्यासाठी आरआरएफएलएल १,२०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. इक्विटी शेअर्सच्या प्राधान्याने ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. याशिवाय ४०० कोटी रुपये पसंतीक्रमानुसार शेअर वॉरंटमध्ये गुंतवण्यात येणार आहेत. या वॉरंटला शेअरमध्ये परावर्तित करण्यासाठी आणि आणि उर्वरित तीन-चतुर्थांश पैसे चुकते केल्यानंतर आरआरएफएलएलकडे एफईएलची आणखी ७.०५ टक्के भागीदारी येणार आहे.

ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याचे दिले वचन

फ्यूचर ग्रुपचे नामांकित स्वरूप आणि ब्रँड तसेच त्याच्या व्यावसायिक इको सिस्टम (एम्बियंट) जपून ठेवल्याचा आम्हाला आनंद आहे. ज्याने भारतातील आधुनिक रिटेल विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्हाला आशा आहे की, रिटेल व्यवसाय, लहान व्यापारी आणि किराणा दुकान तसेच मोठ्या ग्राहक ब्रँडच्या सक्रिय सहकार्याने हा व्यवसाय आणखी वाढत जाईल. आम्ही देशभरातील आमच्या ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत.

ईशा अंबानी, संचालक, रिलायन्स रिलेट वेंचर्स लिमिटेड

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार या व्यवहारासाठी सेबी, एनसीएलटी, सीसीआई, भागधारक आणि अन्य परवानग्याही घेण्यात आल्या आहेत. फ्यूचर समूहाचा व्यवसाय विकत घेतल्याने रिलायन्स रिटेलला आपली स्थिती भक्कम करण्यासाठी मदतच होणार आहे. फ्यूचर समूह कपडे एफएमसीजी सारख्या सामान्य वस्तू आणि एफएमसीजी सारख्या विभागांमधील व्यवसाय करतो.

भागधारकांचे हित विचारात घेतले

या पुनर्रचना आणि व्यवहारामुळे, कोविड -१९ साथीच्या आणि समग्र आर्थिक वातावरणाद्वारे निर्माण झालेल्या आव्हानांवर समग्र निराकरण करण्यासाठी फ्यूचर ग्रुप सक्षम असेल. या करारात त्याच्या सर्व भागधारकांचे हित विचारात घेतले आहे, ज्यात भागधारक, गुंतवणूकदार,पुरवठादार आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.

किशोर बियानी, सीईओ, फ्यूचर समूह