reliance jio 40 crore subscribers count in july
Karlo Duniya Mutthi Mein जिओचे ग्राहक ४० कोटींवर, जुलैमध्ये जोडले ३५ लाख नवे ग्राहक

सर्वाधिक ग्राहक संख्या असलेल्या रिलायन्स जिओने आता ४० कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. जुलै महिन्यात जिओला ३५ लाख ५० हजार नवे ग्राहक जोडले गेले आहेत. दरम्यान जिओ सर्वाधिक ग्राहक असलेली टेलिकॉम कंपनी ठरली असली तरी कोरोना काळातील स्थलांतरामुळे कंपनीच्या ॲक्टिव्ह ग्राहकांच्या संख्येत साडे आठ कोटीची घट झाली आहे.

मुंबई : सर्वाधिक ग्राहक (customers) संख्या असलेल्या रिलायन्स जिओने (reliance jio) आता ४० कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. जुलै महिन्यात (july) जिओला ३५ लाख ५० हजार नवे ग्राहक (new customers) जोडले गेले आहेत. दरम्यान जिओ सर्वाधिक ग्राहक असलेली टेलिकॉम (telecom) कंपनी ठरली असली तरी कोरोना (corona) काळातील स्थलांतरामुळे कंपनीच्या ॲक्टिव्ह ग्राहकांच्या (active customers) संख्येत साडे आठ कोटीची घट झाली आहे.

ट्रायच्या (TRAI) आकडेवारीनुसार देशातील टेलिकॉम ग्राहकांची एकूण संख्या ११४.४ कोटी एवढी आहे. त्यापैकी रिलायन्स जिओकडे ४० कोटी ग्राहक असून एअरटेलच्या ग्राहक संख्येत ३२ लाखाची वाढ झाल्याने त्यांचे एकूण ग्राहक ३२ कोटींवर पोहचले आहेत. तर व्होडाफोन-आयडियाची ग्राहक संख्या ३७ लाखाने कमी होऊन ३० कोटीपर्यंत खाली आली आहे.

दरम्यान भलेही जिओचे ४० कोटी ग्राहक असले तरी त्यामध्ये इनॲक्टिव्ह ग्राहकांची संख्या साडे आठ कोटी आहे. तर एअरटेलचे एकूण ग्राहकांपैकी ९७ टक्के ग्राहक ॲक्टिव्ह असून व्होडाफोन-आयडियाचे एकूण ग्राहकांच्या ८९ टक्के ग्राहक ऑक्टिव्ह असल्याचे ट्रायच्या व्हिजिटर लोकेशन रजिस्टरमुळे समोर आली आहे.