Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea चे लेटेस्ट रिचार्ज आले, जाणून घ्या

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोनकडे आपल्या सर्व ग्राहकांसाठी वेगगेगळ्या प्रकारचे प्लान्स उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या लेटेस्ट रिचार्ज प्लानबाबत.

मुंबई : रिलायन्स जिओ,  एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी नवे बेनिफिट्स आणि ऑफर्स देत आहेत. देशातल्या या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी अलीकडेच काही रिचार्ज प्लान सादर केले आहेत. या प्लानची किंमत 79 रुपयांपासून सुरू होत असून 899 रुपयांपर्यंत आहे. नव्या रिचार्ज प्लानमध्ये प्रिपेड व पोस्टपेड अशा दोन्ही ऑफर्सचा समावेश आहे.

Airtel चे नवे रिचार्ज प्लान

एअरटेलने जुलैमध्ये 289 रुपये व 79 रुपयांचे रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. या दोन्ही प्लानमध्ये Airtel Thanks ॲप, एअरटेल रिटेल स्टोर्स आणि एअरटेलच्या वेबसाइटहून रिचार्ज करता येणार आहे. 

एअरटेलचा 289 रुपयांचा प्रिपेड पॅक Zee5 सब्सक्रिप्शनसोबतच येतो. या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे आणि यात 1.5 जीबी डेटा दररोज मिळतो. म्हणजेच युजर्सला एकूण 42 जीबी डेटाचा फायदा होणार आहे. याशिवाय 100 एसएमएसही मोफत मिळणार आहेत. 

ग्राहकांना अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचाही आनंद घेता येईल. याशिवाय एअरटेल थँक्स बेनिफिटस अंतर्गत ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीम कंटेन्ट आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शनचाही ॲक्सेस या पॅकमध्ये देण्यात येतो.

एअरटेलच्या दुसऱ्या नव्या रिचार्ज प्लानची किंमत 79 रुपये आहे. या पॅकमध्येही  Zee5चे मोफत सब्सक्रिप्शन आहे. हा टॉप-अप प्लान एअरटेल थँक्स ॲपवर डिजिटल स्टोर सेक्शनच्या माध्यमातून सर्व एअरटेल ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

या दोन पॅक व्यतिरिक्त एअरटेलने आपल्या प्रिपेड प्लानसाठी नवीन फ्री डेटा कूपनही लाँच केले आहे. एअरटेल थँक्स ॲप वापरून हे खरेदी करता येतील. हे कूपन 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये, 399 रुपये, 499 रुपये, 558 रुपये आणि 698 रुपयांच्या प्रिपेड प्लानसाठी वैध आहे.

219 रुपयांपासून ते 398 रुपयांच्या प्रिपेड प्लान मध्ये युजर्सला 1 जीबी डेटाचे दोन कूपन मिळतील. ज्याची वैधता 28 दिवस आहे. तर 399, 449 आणि 558 रुपयांच्या रिचार्ज पॅकवर ४ कूपन ऑफर करण्यात येत असून याची वैधता ५६ दिवस आहे. तर 598 रुपये आणि 698 रुपयांच्या प्रिपेड प्लामध्ये 1 जीबी डेटाचे 6 कूपन मिळतील. प्रत्येक कूपनची वैधता 84 दिवस आहे.

Reliance Jio चे नवीन रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओचे नव्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता 28 दिवस आहे. या पॅकमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. याशिवाय जिओचा हा प्लान जिओ नेटवर्कवर अनलिमिडेट कॉल आणि दुसऱ्या नेटवर्कवर १ हजार मिनिटे ऑफर करतो. कॉलिंग व्यतिरिक्त, जिओच्या या पॅकमध्ये 100 एसएमएस दररोज आणि जिओ ॲप्सचे मोफत सब्सक्रिप्शन अशा ऑफर्स आहेत.

याशिवाय जिओने 69 रुपये आणि  49 रुपयांचे रिचार्ज प्लान आपल्या ग्राहकांसाठी बंद केले आहेत. हे दोन्ही प्लान Jio.com आणि My Jio ॲपवरून काढून टाकले आहेत.

Vodafone Idea चे नवे रिचार्ज प्लान

वोडाफोनने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी 819 रुपयांचा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. या प्रिपेड प्लानची वैधता 84 दिवस आहे. ग्राहकांना दररोज २जीबी डेटाचा फायदा मिळतो. या पॅकमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएसही मोफत मिळत आहेत. याशिवाय, या रिचार्ज पॅकमध्ये  वोडाफोन प्ले सब्सक्रिप्शन आणि ZEE5 मेंबरशिप मोफत आहे. नवीन प्लान मध्ये Idea Movies सब्सक्रिप्शनही फ्री आहे आणि  Mobile Shield ची 1 वर्षाची एक्सटेंडेड वारंटीही मिळत आहे.

वोडाफोनने अलीकडेच आपल्या पोस्टपेड युजर्ससाठीही दोन प्लान लाँच केले आहेत. Red Together M आणि Red Max प्लानची किंमत अनुक्रमे 899 रुपये व 699 रुपये आहे. Red Max पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉल मिळणार आहे. याशिवाय 1 वर्षासाठी अमेझॉन प्राइम आणि वोडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शनही मोफत आहे. हा पोस्टपेड प्लान एक डिजिटल ओनली प्लान आहे आणि हा फक्त वोडाफोनच्या वेबसाइटहूनच रिचार्ज करता येणार आहे.

Redm Together M पोस्टपेड प्लानमध्ये एका परिवारातील चार सदस्य कनेक्शन घेऊ शकतात. पोस्टपेड प्लानमध्ये 70जीबी डेटा प्रायमरी मेंबरसाठी ऑफर केला जात आहे. तर 30 जीबी डेटा दर महिन्याला दुसऱ्या सदस्याला मिळतो. या पॅकमध्ये 200जीबी डेटा रोलओव्हर सुविधेसह येतो. तर सेकंडरी नंबर्ससाठी ही रोलओव्हर सुविधा 50 जीबी आहे.