Jio ची जबरदस्त ऑफर; पैसे न देताच 5 वेळा करता येणार रिचार्ज , काय आहे नक्की ऑफर ?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व्हिस खास अशा लोकांसाठी ज्यांना दररोज मिळणारा 4G इंटरनेट डेटा कमी पडतो. असे ग्राहक आता हाय-स्पीड डेटा कोटा संपल्यानंतर त्वरित रिचार्ज (Recharge) करू शकतील.

    नवी दिल्ली: रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एका जबरदस्त प्लॅनची सुरुवात केली आहे. आता ग्राहक पैसे न देताच 5 वेळापर्यंत रिचार्ज करू शकतील. ही एक एमर्जेंन्सी डेटा लोन (Emergency Data Loan) सर्व्हिस आहे. या सर्व्हिसचा वापर युजर्स डेली डेटा लिमिट संपल्यानंतर करू शकतात.

    एका पॅकची किंमत 11 रुपये –

    कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व्हिस खास अशा लोकांसाठी ज्यांना दररोज मिळणारा 4G इंटरनेट डेटा कमी पडतो. असे ग्राहक आता हाय-स्पीड डेटा कोटा संपल्यानंतर त्वरित रिचार्ज (Recharge) करू शकतील. त्यांना एमर्जेंन्सी डेटा लोन सुविधेअंतर्गत ‘रिचार्ड नॉउ अँड पे लेटर’ची (Recharge Now and Pay Later) सुविधा मिळते. या सुविधेअंतर्गत प्रीपेड युजर्सला 1GB चे 5 Emergency डेटा पॅक्स (11 रुपये डेटा पॅक) उधार घेण्याची परवानगी मिळते.