Jio ची कमाल, ३ महिन्यांत जोडले जवळपास १ कोटी ग्राहक

रिलायन्स जिओने आपल्या दमदार मार्केट रणनितीच्या जोरावर कोरोना महामारीत २०२०-२०२१ च्या पहिल्या तिमाहीत 99 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.

मुंबई : Jio Platforms ने 30 जून 2020 ला संपलेल्या तिमाहीत जवळपास 1 कोटी नवे ग्राहक जोडले आहेत. यासोबतच आता कंपनीच्या एकूण सब्सक्रायबर्स ची संख्या 39.8 कोटी झाली आहे. जिओ ने आपला तिमाहीचा डेटा रिलीज केला आहे ज्यात गेल्यावर्षी याच तिमाहीच्या तुलनेत 182.8 टक्के निव्वळ नफा झाला आहे.  कोरोना विषाणू महामारीच्या संकटातही सर्विस प्रोव्हायडर मोठ्या संख्येने नवे यूजर्स आणि  इयर-ऑन-इयर वाढ करण्यात कंपनी यशस्वी झाली आहे. कंपनीने Jio POS-Lite ॲपही या काळात लाँच केले.

2020-2021 च्या पहिल्या तिमाहीच्या परफॉर्मेंस रिपोर्टमध्ये रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. जिओने या तिमाहीत 99 लाख नवे ग्राहक जोडले. जनवरी-मार्च 2020 या तिमाहीच्या तुलनेत हे ग्राहक कमी आहेत कारण जानेवारी-मार्चच्या तिमाहीत कंपनीने 1.75 कोटी नवे ग्राहक जोडले होते.

जिओने Jio POS-Lite ॲप लाँच करून आपला युजर बेस वाढता ठेवला आहे. हे ॲप एप्रिलमध्ये लाँच केले होते. या ॲपच्या माध्यमातून युजर्स दुसऱ्या नंबरचा रिचार्ज करून 4.16 टक्के कमिशनही मिळवू शकतात. याशिवाय कंपनीने टाळेबंदीत आपल्या सर्व युजर्ससाठी इनकमिंग कॉल व्हॅलिडिटी वाढविली होती.

जिओने अलीकडेच मेड इन इंडिया 5G तंत्रज्ञान आणणार असल्याची घोषणाही केली आहे. 5जी स्पेक्ट्रम भारतात उपलब्ध होताच याची चाचणी सुरू होईल आणि पुढच्या वर्षी फील्ड डिप्लॉयमेंटसाठी हे तंत्रज्ञान तयार होणार आहे.