सोने, चांदीच्या दरात वाढ

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,339 रुपये तोळा होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो 245 रुपयांनी वाढून 70,433 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 68,784 रुपये होता.

    दिल्ली :  सोने-चांदीच्या दरात सोमवारी वाढ नोंदविली गेली. दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा 69 रुपयांनी वाढून 47,354 रुपयांवर पोहोचले. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याने देशातही दर वाढल्याचे सांगितले जात आहे.

    मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,339 रुपये तोळा होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो 245 रुपयांनी वाढून 70,433 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 68,784 रुपये होता.

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस 1,793 डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 26.60 डॉलर आहेत.