सोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार?; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर

गोल्ड हॉलमार्किंगमुळे (Gold Hallmarking) सोन्याची दागिन्यांची (Gold jewellery) शुद्धता ठरते. यापुढे सोने व्यावसायिकांना (Gold Businessmen) दागिन्यांची विक्री (sale) करताना बीआयएसचे (BIS) मापदंड पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग (Hallmarking) मिळेल.

  मुंबई : उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking) अनिवार्य असेल. त्यामुळे सोनं खरेदी (Purchase) करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता (purity) ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग (BIS Hallmarking) सक्तीचं (mandatory) करण्यात आलं आहे. या नियमाचा ढाचा दीड वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. मात्र कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) तो लागू करण्यात आला नव्हता. आता उद्यापासून देशात त्याची अंमलबजावणी (Implementation) सुरू होईल.

  गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे काय? Gold Hallmarking

  गोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याची दागिन्यांची शुद्धता ठरते. यापुढे सोने व्यावसायिकांना दागिन्यांची विक्री करताना बीआयएसचे मापदंड पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग मिळेल.

  कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग? What Type Of Gold

  सोन्याच्या शुद्धतेनुसार त्याचे विविध प्रकार पडतात. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग गरजेचं आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट असं आहे.

  किती आहे दंडाची तरतूद? Penalty Provision

  नियमाचं उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा २०१६ च्या २९ कलमाखाली कारवाई केली जाऊ शकते. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १ वर्षाचा कारावास आणि १ लाख रुपयाच्या दंडाची तरतूद आहे.

  फसवणूक झाल्यास कुठे कराल तक्रार? Complain In Case Of Fraud

  दुकानदारानं तुमची फसवणूक केल्यास ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी बीआयएसच्या मोबाईल ऍप किंवा तक्रार नोंदणी पोर्टलचा वापर करू शकता.

  घरात असलेल्या सोन्याचं काय? Gold In The House

  ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात.

  Rules Changes mandatory gold hallmarking be implemented tomorrow know the details