सॅमसंगचाच बोलबाला, चायनीज स्मार्टफोन कंपन्यांची हालत खराब

सॅमसंग चायनीज स्मार्टफोन ब्रँड्सला तगडी टक्कर देत आहे. कंपनीने कोविड-१९ टाळेबंदीच्या काळात आकर्षक मार्केट फंड्यांचा अवलंब करत ती देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी ठरली आहे. तर, दरम्यानच्या काळात सॅमसंगने वेगाने आपल्या ७ नव्या स्मार्टफोन्सने हेही जाहीर केलं की, ती भारतात पुन्हा नंबर १ ब्रँड होण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबई : भारतीय युजर्सच्या अँटी-चायना सेंटिमेंट्सचा सॅमसंगला खूपच फायदा होत आहे. कंपनीने अलीकडेच शाओमीला टक्कर देण्यासाठी खूप सारे बजेट फोन्स लाँच केले आहेत. भारतीय युजर्सच्या अँटी-चायनीज सेंटिमेंट्सचा फायदा घेत पुन्हा एकदा नंबर १ होण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी कंपनी सातत्याने नवीन फोन लाँच करत आहे. तर, कोविड- १९ टाळेबंदीच्या काळात सॅमसंगला चायनीज कंपन्यांच्या पुढे जाण्यास खूपच मोठी मदत झाली.

चायनीज ब्रँड्सला तगडी टक्कर

सॅमसंग भारतात एकमेव अशी नॉन-चायनीज कंपनी आहे जी यावेळी चायनीज स्मार्टफोन ब्रँड्सला तगडी टक्कर देत आहे. चीनविरोधात भारतीय युजर्सचा राग अनावर झाला आहे. यामुळेच दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग 26 टक्के मार्केट शेअरसह देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड ठरला आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या डेटानुसार दुसऱ्या तिमाहीत शाओमीचा मार्केटमधील हिस्सा 29 टक्के होता.

भारत आहे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं मार्केट

काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, भारतात यावेळी सॅमसंगचा अॅन्युअल रिटेल स्मार्टफोन रेव्हेन्यू 7.5 बिलियनचा आहे. या आकडेवारीवरून लक्षात येते की, अमेरिकेनंतर भारत हाच सॅमसंगसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठं मार्केट आहे.

टाळेबंदीचा घेतला मोठा पायदा

सॅमसंगची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही कंपनी अनेक अंतर्गत आवश्यक घटकांचाच वापर करते. यामुळेच कोविड-१९ टाळेबंदीत कंपनीला खूप फायदा झाला. तर , शाओमी आणि ओप्पो सारखे चायनीज ब्रँड्स कोविड-१९ टाळेबंदीच्या काळात प्रॉडक्शनमध्ये समस्यांचा सामना करण्यासोबतच प्रॉडक्ट डिले होण्याच्या समस्येलाही सामोरं जावं लागलं.

सातत्याने नवीन फोन लाँच करत आहे सॅमसंग

सॅमसंग आजकाल आपले नवीन स्मार्टफोन सातत्याने लाँच करत आहे. जून 2020 पासून ते आतापर्यंत कंपनीने ७ नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत आणि यातील तीन स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे.