Samsung Independence Day Offer : टीव्ही व फ्रीजच्या खरेदीवर मोबाइल मिळणार फ्री

फ्रीज, टीव्ही, स्मार्ट ओवन, वॉशिंग मशिन आणि एसी यांसारख्या अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर सॅमसंगने दिल्या आहेत. जाणून घ्या काय आहेत ऑफर्स.

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगचे प्रोडक्ट्स विकत घेण्याचा विचार असेल तर ग्राहकांना नामी संधी चालून आली आहे. कंपनीने Samsung Independence Day offer ची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत फ्रीज, टीव्ही, स्मार्ट ओव्हन, वॉशिंग मशिन आणि एसी यांसारख्या अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर मिळत आहेत.

1 ऑगस्टपासून हा सेल सुरू झाला असून 31 ऑगस्टपर्यंत ऑफरचा फायदा घेता येईल. यामध्ये ग्राहकांना 15 टक्के कॅशबॅक फायनान्स स्कीमचा फायदा मिळेल. याशिवाय 990 रुपये ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे. युजर्सना प्रोडक्ट्स सहज खरेदी करता यावेत यासाठी कंपनीने खास My Samsung My EMI ऑफरही आणली आहे. यानुसार, ईएमआयचा कमाल कालावधी 36 महिने असणार आहे. ऑफरमध्ये सॅमसंग QLED TV, 4K UHD TV, Smart TV, SpaceMax Family Hub रेफ्रिजरेटर, Sie-By-Side आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजिरेटर, फ्लेक्सवॉश वॉशिंग मशीन, ॲडवॉश वॉशिंग मशीनसह अन्य अनेक प्रोडक्ट्सवर निश्चित बेनिफिट मिळणार आहेत.

QLED 8K TV वर 77,999 रुपयांचा मोबाइल फ्री

ऑफरमध्ये कंपनीने आपल्या QLED 8K TV वर 77,999 रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी S20+ स्मार्टफोन फ्रीमध्ये ऑफर केला आहे. यासोबतच सेलमध्ये खरेदी केलेल्या या टीव्हीवर 10 वर्षांची नो-स्क्रीन बर्न-इन वॉरंटी आणि काही निवडक QLED TV च्या पॅनल्सवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

स्मार्ट टीव्हीवर 9 हजार रुपये कॅशबॅक

सॅमसंगचा स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांना 9 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. तसेच, 43 इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या स्क्रीन साइजचे मॉडेल्स 990 रुपये ईएमआयच्या पर्यायांसह खरेदी करता येणार आहेत.

फ्रीज खरेदी केल्यास 38 हजारांचा फोन मिळणार फ्री

कंपनीचा स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदी करणाऱ्या युजर्सना 37 हजार 999 रुपयांचा गॅलेक्सी नोट 10 लाइट स्मार्टफोन कंपनीकडून मोफत देण्यात येणार आहे. तर, 300 लीटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या फ्रिज आणि वॉशिंग मशीनवर कंपनी 15 टक्के कॅशबॅक देत आहे. तसेच, 990 रुपये ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे. सेलमध्ये सॅमसंगच्या ओवन आणि एसीवरही आकर्षक ऑफर आहेत.