सॅमसंग मोबाईल कंपनी भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली – सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या दक्षिण कोरियाच्या सॅमसंग मोबईल कंपनीने आता चीनमध्ये आपला प्रकल्प न उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच सॅमसंग मोबाईल कंपनी ही अनेक

 नवी दिल्ली –  सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या दक्षिण कोरियाच्या सॅमसंग मोबईल कंपनीने आता चीनमध्ये आपला प्रकल्प न उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच सॅमसंग मोबाईल कंपनी ही अनेक विदेशी कंपन्यांपेक्षा अधिकपटीने लोकप्रिय आहे. परंतु संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूसारखी जीवघेणी परिस्थिती निर्माण करून, आम्ही तसे काहीच केले नाही, असा दाव्या करणाऱ्या चीनला आता त्याची किंमत मोजावी लागणार आहे. तसेच आता ही कंपनी भारतातील उत्तरप्रदेश या राज्यात स्मार्टफोन डिस्प्ले बनविण्याचा प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी भारतात ५ हजार ३६७ कोटींची गुंतवणूक सॅमसंग कंपनी करणार आहे. 

दरम्यान, २०१९ मध्ये सरकार आणि कंपनी दोघांकडूनही यासंदर्भातील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी उत्तरप्रदेशात उभारल्यानंतर १३०० जणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असल्याचे इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच हा प्रकल्प २०२१ पासून सुरु होणार आहे.