SBI चे होम लोन महाग ; ग्राहकांना दणका, व्याजदर वाढविले

बँकेने किमान व्याजदरात 25 बेसिस पॉईँट किंवा 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. मागील महिन्यात एसबीआयने 31 मार्चपर्यंत एक विशेष ऑफर जाहीर केली होती. यामध्ये होम लोन 6.70 टक्क्यांवर उपलब्ध झाले होते. आता पुन्हा त्यात वाढ केली आहे. त्यामुळे एसबीआयच्या पावलावर पाऊल ठेवत इतर बँकाही व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. बँकेने प्रोसेसिंग शुल्कही आकरले आहे.

    दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकने गृह कर्जाचे (होम लोन) दर वाढवले आहेत. एसबीआयने किमान व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार आता व्याजदर 6.70% वरुन वाढून 6.95% झाला आहे. नवे दर 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत.

    बँकेने किमान व्याजदरात 25 बेसिस पॉईँट किंवा 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. मागील महिन्यात एसबीआयने 31 मार्चपर्यंत एक विशेष ऑफर जाहीर केली होती. यामध्ये होम लोन 6.70 टक्क्यांवर उपलब्ध झाले होते. आता पुन्हा त्यात वाढ केली आहे. त्यामुळे एसबीआयच्या पावलावर पाऊल ठेवत इतर बँकाही व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. बँकेने प्रोसेसिंग शुल्कही आकरले आहे.

    जे कर्ज रकमेच्या 0.40 टक्क्यांबरोबर जीएसटीही असेल. किमान 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये जीएसटीच्या अधीन असतील. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, त्यांचे होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड रेट (इबीएलआर) पेक्षा 40 बीपीएसच्या वर उपलब्ध आहेत. इबीएलआर जो आरबीआयच्या रेपो रेटशी निगडीत आहे. सध्या तो 6.65 आहे. याचाच अर्थ होम लोन 7 टक्क्यांवर उपलब्ध होईल. जर होम लोनसाठी अर्जदार महिला असेल तर तिला 5 बीपीएस सवलत मिळेल. त्यामुळे व्याजदर 6.95 टक्क्यांवर मिळेल.