Selling banks is a mistake; Raghuram Rajan warns government

चालू वर्षात दोन सरकारी बँका आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. यापैकी दोन बँकांचे खासगीकरण 2021-22 या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. या खासगीकरणानंतर सरकारी बँकांची संख्यी 10 राहणार आहे.

    दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणावरून पुन्हा एकदा इशारा दिला आहे. खासगीकरणावरील सरकारचा रेकॉर्ड हा चढ-उतार असलेला आहे. औद्योगिक घराण्यांना बँकांची विक्री करणे ही घोडचूक ठरू शकते. यामुळे सरकारने हे पाऊल उचलू नये, असा सल्ला रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

    भारताला पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य हे अपेक्षेपेक्षा अधिक आहे. याची योग्य प्रकारे गणनाच केली गेली नाही. भारताची आर्थिक धोरणांची चौकट चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यास आणि विकासास प्रोत्साहन देण्यास मदत करते. कोणताही मोठा बदल बाँड बाजारावर परिणाम करू शकतो.

    यावेळच्या अर्थसंकल्पात खर्च आणि उत्पन्नात पारदर्शकता दिसून येत आहे. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात असे चित्र दिसत नव्हते. सध्याची स्थिती पाहता बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय योग्य ठरणार नसल्याचे रघुराम राजन एका कार्यक्रमात म्हणाले.