sensex

मुंबई शेअर बाजाराच्या(share market) सेन्सेक्सने(sensex) आज एक नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला.

मुंबई शेअर बाजाराच्या(share market) सेन्सेक्सने(sensex) आज एक नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. सोमवारी दिवसअखेर १५४ अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ४६,२५० अंकांच्या पुढे बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीेदेखील ४४ अंकांच्या वाढीसह विक्रमी १३,५५८ अंकांवर बंद झाला. आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि कोटक बँकच्या शेअर्समध्येही वाढ झाल्याचे दिसून आले.

परकीय गुंतवणूकीचा ओघ कायम आहे. तसेच जागतिक शेअर बाजाराही चांगल्या स्थितीमध्ये आहे. याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसला. आज मुंबई शेअर बाजाराने ४६,३७३ ही ऐतिहासिक उंची गाठली होती. पण त्यानंतर काही अंकांची घट होऊन बाजार ४६,२५३ अंकांवर बंद झाला.

निफ्टी १३,५५८ अंकांवर बंद झाला असला तरी, निफ्टीने सुद्धा १३,५९७ हा सार्वकालीन उच्चांक गाठला होता. आज ओनजीसी शेअर्सला चांगलाचा फायदा झाला. त्यानंतर एल अँड टी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचसीएल टेक, टायटन आणि कोटक बँकच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.