शेअर बाजारात सेन्सेक्सची ४५० अंकांच्या वाढीसह उसळी, निफ्टीनेही गाठला उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४५३ अंक म्हणजेच ०.९० टक्क्यांच्या तेजीसह ५०,७४९.९५ वर बंद झाला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील निफ्टी ५० मध्येही १४१ अंक म्हणजेच ०.९५ टक्क्यांनी वाढ होऊन ते १५,०६०.१० च्या पातळीवर सुरू झाले.

    मुंबई : स्थानिक शेअर बाजारात सेन्सेक्सने ४५० अंकांच्या वाढीसह जोरदार उसळी घेतली असून निफ्टनेही १५००० च्या वर उच्चांक गाठला आहे. आज (बुधवार) आशियाई बाजारात तेजी दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराच प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४५३ अंक म्हणजेच ०.९० टक्क्यांच्या तेजीसह ५०,७४९.९५ वर बंद झाला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील निफ्टी ५० मध्येही १४१ अंक म्हणजेच ०.९५ टक्क्यांनी वाढ होऊन ते १५,०६०.१० च्या पातळीवर सुरू झाले.

    निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांकही ८४२३.४० सह ५२ आठवड्यांच्या अखेरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही तेजी दिसून येत आहे. सीएनएक्स मिडकॅप निर्देशांक ग्रीन मार्क वर ट्रेड करीत आहे.

    सेक्टरल फ्रंटवरील जवळपास सर्वच क्षेत्र ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. यामध्ये ऑटो, बँकिंग, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, फार्मा, आयटी, मेटल, तेल, गॅस, टेक आणि पीएसयू या सेक्टर्सचा समावेश आहे.