sensex

शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या (Sensex Crossed 57 Points)पुढे गेला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्स ५७ हजारांपर्यंतचा टप्पा गाठू शकला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे. 

    भारतीय शेअर बाजारात(Indian Share Market) आज चांगले चित्र दिसून आले आहे. शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या (Sensex Crossed 57 Points)पुढे गेला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्स ५७ हजारांपर्यंतचा टप्पा गाठू शकला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे.  शेअर बाजारात गुंतवणूक(Investment In Share Market) वाढल्याने सेन्सेक्ससोबत निफ्टीतही वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी १७ हजारापर्यंत पोहोचला होता.

    अमेरिकेच्या बाजाराची चांगली स्थिती, देशातील कोरोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि लसीकरण मोहीमेला आलेली गती यामुळे बाजारामध्ये उत्तम स्थिती दिसून आली. तसेच ऑटो क्षेत्रातील विक्री आणि वाढता जीडीपी यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. आज टाटा स्टील, रिलायन्स, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, मारूती,ईजी ट्रिप प्लानर्स, एलअँडटी आणि एक्सिस बँकेच्या शेअर्सवर नजर असणार आहे. आज बीएसईवर लिस्टेड एएफ इन्टरप्राजेज, एजेल, धरानी शुगर्सस अँड केमिकल्स, इंडियन सूक्रोज, न्यूटाइम इन्फ्रा, ऑप्टो सर्किट्स, सूरतवाला बिझनेस ग्रुप, स्माईलडायरेक्ट क्लब आणि सिधु ट्रेड लिंक्स यांचे आर्थिक परिणाम येणार आहेत.

    भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी चांगले बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने विक्रमी स्तर गाठला होता. बीएसई सेन्सेक्स २०५ अंकांच्या तेजीसह सुरु झाला. तेव्हा सेन्सेक्स ५६,३२९.२ होता. त्यानंतर बाजार बंद होताना सेन्सेक्स ८३४ अंकासह ५६,९५८.२७ वर पोहोचला होता. शेवटी सेन्सेक्स ७६५.०४ अंकासह ५६,८८९.७६ अंकांवर बंद झाला. याचबरोबर निफ्टीही सोमवारी ७० अंकांच्या वाढीसह १,७७५.८५ वर सुरु झाला. बाजार बंद होता निफ्टी २२५.८५ अंकांसह १६,९३१.०५ वर बंद झाला होता.