national stock exchange

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधल्या(national stock exchange) सगळ्या विभागातील ट्रेडिंग आज तांत्रिक बिघाडामुळे ११.४० मिनिटांनंतर थांबवण्यात आले आहे. तसेच ११.४३ ला कॅश मार्केटचे व्यवहारदेखील थांबवण्यात आले आहेत.

    शेअर बाजारात(share market) ट्रेडिंग(trading) करणाऱ्यांसाठी आजचा दिवस निराशाजनक आहे, असे म्हणावे लागेल. कारण नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधल्या(national stock exchange) सगळ्या विभागातील ट्रेडिंग आज तांत्रिक बिघाडामुळे ११.४० मिनिटांनंतर थांबवण्यात आले आहे. तसेच ११.४३ ला कॅश मार्केटचे व्यवहारदेखील थांबवण्यात आले आहेत. सकाळपासून जाणवत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे इंडेक्स अपडेट व्हायला अडथळे येत आहेत.

    तज्ञांच्या मते या तांत्रिक बिघाडामुळे ट्रेडर्सचे मोठे नुकसान होणार आहे. कारण स्टॉक्स अपडेट होतायंत मात्र इंडेक्स अपडेट होत नाहीये शेअर मार्केटला अशा समस्येचा सामना करायला लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रेडर्सना या गोष्टीची चिंता आहे की आता त्यांनी पुढे काय करावं. लवकरच ही परिस्थिती सुधारेल असं एनएसइकडून सांगण्यात आले आहे.

    दरम्यान ज्यांना ट्रेडिंगसाठी अडथळे येत आहेत त्यांनी बीएसइमध्ये(बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) जाऊन ट्रेडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    अशा परिस्थितीत काय केले जाते ?

    सकाळचे २ तास तांत्रिक बिघाडामुळे वाया गेले आहेत. अशात ट्रेडिंगची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    अशा तांत्रिक बिघाडानंतर एनएसइला एक अहवाल बनवावा लागतो. तो बनवून सेबीकडे द्यावा लागतो. असं होण्यामागची कारणं आणि त्यावरील उपाय हेदेखील या अहवालात लिहावे लागते. तसेच पुन्हा असं काही होऊ नये यासाठीची योजना काय असेल हेसुद्धा सांगावे लागते. सेबीला जर कोणत्या शंका असतील तर सेबी प्रश्न विचारते. तसेच आपल्या तांत्रिक सल्लागार मंडळाचा सल्लाही सेबी लक्षात घेते.