शेअर बाजार आज विक्रमी स्तरावर

निफ्टीने पहिल्यांदाच 18,000 च्या स्तराला स्पर्श केला. सेंसेक्सनेदेखील 60,476 या विक्रमी स्तराला स्पर्श केला. मात्र, अखेरच्या काही तासात बाजारातील तेजी मंदावली. उच्च स्तरावरील सेंसेक्स सुमारे 350 अंकांनी आणि निफ्टी सुमारे 100 अंकांनी गडगडले.

    सेंसेक्स (Sensex )60,135 तर निफ्टी 17,945 वर बंद
    मुंबई. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने इतिहास रचला. निफ्टीने पहिल्यांदाच 18,000 च्या स्तराला स्पर्श केला. सेंसेक्सनेदेखील 60,476 या विक्रमी स्तराला स्पर्श केला.

    मात्र, अखेरच्या काही तासात बाजारातील तेजी मंदावली. उच्च स्तरावरील सेंसेक्स सुमारे 350 अंकांनी आणि निफ्टी सुमारे 100 अंकांनी गडगडले. दिवसअखेरीस सेंसेक्स 76 अंक म्हणजेच 0.13% वाडून 60,135 वर तर निफ्टी 50 अंक म्हणजेच 0.28% ने वधारून 17,945 वर बंद झाले. तत्पूर्वी सेंसेक्स 60,099 अंक आणि निफ्टी 17,867 अंकावर सुरू झाले होते.