Mumbai Municipal Corporation will raise money from the stock market

जागितक शेअ बाजारात सकारात्मक दिशा असतानाही बीएसईचा निर्देशांक मंगळवारी 465 अंशांनी कोसळला. निर्देशांकात भागीदार असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि. आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये पडझड झाल्याने बाजार कोसळला.

    मुंबई : जागितक शेअ बाजारात सकारात्मक दिशा असतानाही बीएसईचा निर्देशांक मंगळवारी 465 अंशांनी कोसळला. निर्देशांकात भागीदार असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि. आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये पडझड झाल्याने बाजार कोसळला.

    तीस शेअर्सचा समावेश असलेल्या बीएसईचा निर्देशांक 465.01 अंश म्हणजेच 0.95 टक्के तुटीसह 48253.51 वर स्थिरावला तर निफ्टीत 137.65 अंश म्हणजेच 0.94 अशांची तूट होत तो 11496.50 अंशावर बंद झाला. तथापि, बाजारात सुरुवातच मजबुतीने झाली होती.

    व्यवसाया दरम्यान बाजारात 200 अंशांनी वाढही झाली होती व निर्देशांकाने 242.57 अंशांची वाढ नोंदवत 48961.09 अंशावर झेपही घेतली होती. तथापि ही स्थिती कायम राहू शकली नाही आणि दुपारनंतर त्यात घसरण झाली. कोविड संक्रमणामुळे विक्रीला उधाण आले आणि त्याचा परिणाम बाजार घसरण्यात आला.