स्टोरिया फूड अँड बेव्हरेजची वेबसाइट मुंबईत लाँच होणार

स्टोरिया फूड अँड बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईत डायरेक्ट-टू -ग्राहक चॅनेल shop.storiafoods.com ही वेबसाईट सुरू करण्याची आज घोषणा केली. सध्या ग्राहकांचा कल ऑनलाइन शॉपिंगकडे वळत आहे.

मुंबई : स्टोरिया फूड अँड बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईत डायरेक्ट-टू -ग्राहक चॅनेल shop.storiafoods.com ही वेबसाईट सुरू करण्याची आज घोषणा केली. सध्या ग्राहकांचा कल ऑनलाइन शॉपिंगकडे वळत आहे. हा बदल लक्षात घेऊन आम्ही ऑनलाईनला शॉपिंगला प्रोसाहन देत आहोत. हा उपक्रम येत्या काही महिन्यात देशातील इतर शहरांमध्ये सुरू होईल असे मत स्टोरिया फूड्स अँड बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल शाह यांनी व्यक्त केले.

ही वेबसाइट मुंबईतील दुकानदारांना एक्सक्लुसिव ऑफर्ससह स्टोरियाच्या उत्पादनांची ऑनलाईन ऑर्डर करण्यास मदत होईल. कंपनीने सर्व प्रीपेड ऑर्डरवर ‘शून्य संपर्क वितरण’ हा उपक्रम देखील सुरू केला आहे. आपल्या उत्पादनाची पोहोच विस्तृत करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत, स्टोरियाने आधुनिक व्यवसायात आपली उपस्थिती दर्शविली आहे आणि ई-कॉमर्स चॅनेलचा विस्तार आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यास होईल.

कोविड -१९ प्रकोप आणि होम कोरोनटाईन नियमांसह, आम्ही ऑनलाइन शॉपिंगमध्ये अभूतपूर्व स्पाइक पाहिले आहे, वितरण आणि रहदारी किरकोळ विक्रेते आपल्या मालावर लक्ष ठेवण्या बरोबर ग्राहक आणि कामगारांचे संरक्षण यावर लक्ष केंद्रित करत असतात. गो-टू-मार्केट या रणनीतीमुळे आमचे लक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहे. आम्ही या कठीण काळात आमच्या ग्राहकांना मदत करण्यावर आमचे लक्ष केंद्रित केले आहे असेही शाह यांनी नमूद केले.