Strike of employees of Mannapuram branch giving gold loan near Thane railway station

ठाणे स्टेशन जवळ असलेल्या मण्णपुरम गोल्ड लोन देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे मण्णपुरमच्या ठाण्यातील कार्यालयांना टाळे लागले आहे.

  • कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यामुळे भारतीय कामगार सेनेने पुकारला संप

ठाणे : सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या मण्णपुरम कंपनीच्या विविध शाखेतून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करीत भारतीय कामगार सेनेने कार्यालयाला तळे लावले आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात दादापाटील वाडी परिसरातील कर्मचारी यांनीही संप पुकारला असून मण्णपुरम कार्यालय बंद करण्यात आले आहे. जो पर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याचा विचार होणार नाही तो पर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

ठाणे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या मण्णपुरम गोल्ड लोन देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे मण्णपुरमच्या ठाण्यातील कार्यालयांना टाळे लागले आहे. मण्णपुरम कंपनीने कर्मचाऱ्यांना एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत पगार नाही, प्रत्येक महिन्याला पगारातून होणारी बेकायदेशीर कपात, विविध राजांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर बदल्या, ९ तास काम करूनही जेवणाची आणि चहाची वेळ मिळत नाही, किमान वेतन कायद्यानुसार पगार नाही अशा विविध पद्धतीने कामगारांचे शोषण होत असल्याने भारतीय कामगार सेनेद्वारे कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी मण्णपुरम कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. कंपनी कामगारांचे शोषण थांबवत नाही तो पर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे कर्मचारी अक्षय सावंत याने सांगितले.