फ्लिपकार्टवर जबरदस्त सेलचे पुनरागमन, प्रोडक्टवर मिळणार सूट

  • इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तर मोबाइल फोन्सवर ३० ते ४० टक्के सूट देऊन एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. रेडमी नोट ७ प्रो, ऑनर १० लाइट, सॅमसंग गॅलेक्सी सीरीज, अॅपल आयफोन्स, आसुस मॅक्स प्रो आणि शाओमी रेडमी ७ सीरीजवर बंपर ऑफर्स मिळणार आहेत.

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर जबरदस्त सेलचे पुनरागमन होत आहे. येत्या ६ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेजची सुरुवात होणार आहे. तसेच ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंतच हा सेल असणार आहे. या सेलमध्ये शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना मोबाइल्, इलेक्ट्रॉनिक्, फॅशन आणि अन्य कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सूट मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तर मोबाइल फोन्सवर ३० ते ४० टक्के सूट देऊन एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.  रेडमी नोट ७ प्रो, ऑनर १० लाइट, सॅमसंग गॅलेक्सी सीरीज, अॅपल आयफोन्स, आसुस मॅक्स प्रो आणि शाओमी रेडमी ७ सीरीजवर बंपर ऑफर्स मिळणार आहेत.

फोन्सवर एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि बायबँक गँरटी सुद्धा मिळणार आहे. तसेच टीव्ही आणि अन्य दुसऱ्या होम अप्लायन्सेजवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेपासून फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला अर्ली ॲक्सेस मिळणार आहे. या सेलमध्ये सिटी बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्स, आयसीआयसीआय कार्ड्स वरून शॉपिंग केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे.