पृष्ठभाग निर्जंतुक करणारा स्प्रे बाजारात दाखल

पृष्ठभाग निर्जंतुक करणारा हा स्प्रे सुरक्षित असून, तुमचे घर, ऑफिस आणि कार निर्जंतुक करायला सोयीचा आहे.

मुंबई : जगातील सर्वांत मोठे अगरबत्तीचे निर्माते आणि सायकल प्युअर अगरबत्तींचे निर्माते एन. रंगा राव आणि सन्स (एनआरआरएस) या कंपनीने आयुष मंत्रालयाच्या वतीने प्रमाणित केलेला ‘हिलिंग टच पृष्ठभाग निर्जंतुक करणारा स्प्रे’ बाजारात सादर केला आहे. हा स्प्रे आयुर्वेदिक औषधे निर्माण करण्याच्या पद्धतीनुसार तयार करण्यात आला असून, हा स्प्रे सच्छिद्र नसलेल्या पृष्ठभागावर फरवारताच ९९.९ टक्‍के विषाणू, जंतू आणि बुरशीचा नाश करून टाकतो.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण ऑफिस, लिफ्ट, टॉयलेट, टॅक्सी किंवा इतर प्रवासाच्या साधनांमधील वेगवेगळ्या पृष्ठभागांच्या संपर्कात येतो. प्रवासात, परत घरी येतानाही तसेच घडते. या सर्व पृष्ठभागांवर वेगवेगळे जंतू आणि पॅथोजेन्स बराच काळ राहिलेले असतात.

द हिलिंग टच हा अनेक पृष्ठभागांना निर्जंतुक करणारा स्प्रे २५० मिली एरोसोलसोबत मिळतो. त्यामध्ये ८६.४ टक्‍के v/v इथाइल अल्कोहोल आहे. तुम्हाला फक्त केवळ सच्छिद्र नसलेल्या पृष्ठभागावर तो फवारावा लागेल. काही सेकंदांसाठी वाळू द्या आणि त्या पृष्ठभागावरील ९९.९ टक्‍के विषाणू, जंतू आणि बुरशीचा नाश करण्यासाठी तो पृष्ठभाग पुसून घ्या. या फवाऱ्यात लिंबाचे तेल आहे, जे नैसर्गिकरित्या निर्जंतुकीकरण करते आणि आपला मूड ताजातवाना करते.

द हिलिंग टच हा अनेक पृष्ठभागांना निर्जंतुक करणारा स्प्रे सच्छिद्र नसलेल्या घरातील, ऑफिसमधील, गाड्यांमधील पृष्ठभागांवर वापरला जाऊ शकतो. दरवाज्यांची हँडल्स, लिफ्टमधली बटणं, गाड्यांमधील सीट्स, कोच किंवा सोफा, गाद्या, उशा, गालिचे, स्वयंपाकघरातील सिंक, त्याचबरोबर उग्र वास येणारी ठिकाणे जसे की, बाथरूम, बाथ टब, शॉवर, टॉयलेट सीट, फॅसेट्स, शॉवरचे पडदे आणि कचऱ्याच्या डब्यांवरही तुम्ही हा स्प्रे फवारू शकता.

 ‘’आरोग्यपूर्ण जगण्यासाठी स्वच्छता आणि साफ परिसर या पायऱ्या आहेत. आपली शहरे सध्या गर्दीने गजबजू लागली असल्यामुळे आपल्याला वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छता राखण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. आपले घर आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या जंतूंचा, विषाणूंचा आणि बुरशींचा सामना करावा लागतो, ही सर्व ठिकाणे चटकन स्वच्छ करण्यासाठी सर्वांत सोयीचा उपाय म्हणजे हिलिंग टच हा अनेक पृष्ठभागांना निर्जंतुक करणारा स्प्रे वापरणे. हा ब्रँड भारतातच तयार करण्यात आला असून, आयुष मंत्रालयाने घालून दिलेल्या आयुर्वेदिक औषधे बनवण्याच्या सर्व मानकांचे पालन यात करण्यात आले आहे. त्यात वापरण्यात आलेले सर्व घटक तपासून घेतलेले आहेत.’’ असे मत या लाँचवेळी रिप्पल फ्रेगनन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक किरण रंगा यांनी व्यक्त केले. 

हे उत्पादन किराणा दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स, रिटेल दुकाने आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून ग्राहकांना विकत मिळू शकते. हा अनेक पृष्ठभागांना निर्जंतुक करणारा स्प्रे २५० मिली प्रकारात उपलब्ध असून त्याची किंमत १६५ रुपये आहे.