केंद्र सरकारने एअऱ इंडिया ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कंपन्यांनी रस दाखवला होता. मात्र टाटा सन्स आणि स्पाईसजेट या दोन कंपन्या वगळता इतर सर्वांच्या निविदा रद्द झाल्या. बहुतांश कंपन्यांच्या निविदा या आवश्यक ते निकष पूर्ण करू न शकल्यामुळे फेटाळल्या गेल्याचे दिसते. 

    एअर इंडिया कंपनी कोण विकत घेणार, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. ही कंपनी विकत घेण्यासाठी टाटा सन्स आणि स्पाईस जेट या दोन कंपन्यांमध्ये चुरस असल्याचं सध्या चित्र आहे. या दोन कंपन्यांपैकी कुणाला एअर इंडियाची मालकी मिळणार, याची उत्सुकता आहे.

    केंद्र सरकारने एअऱ इंडिया ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कंपन्यांनी रस दाखवला होता. मात्र टाटा सन्स आणि स्पाईसजेट या दोन कंपन्या वगळता इतर सर्वांच्या निविदा रद्द झाल्या. बहुतांश कंपन्यांच्या निविदा या आवश्यक ते निकष पूर्ण करू न शकल्यामुळे फेटाळल्या गेल्याचे दिसते.

    एअर इंडियाच्या २२९ कर्मचाऱ्यांनीही कंपनी विकत घेण्याची तयारी केली होती. अनिवासी भारतीय उद्योगपती लक्ष्मीप्रसाद यांच्या अमेरिकेतील इंटरप्स फंड या कंपनीनं कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची तयारीदेखील दाखवली होती. मात्र त्यांच्या निविदा फेटाळण्यात आल्याचं सांगण्यात आलं. अशा प्रकारे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी निविदा भरल्या, त्यापैकी सर्वांच्या निविदा फेटाळल्या गेल्या असून केवळ टाटा सन्स आणि स्पाईसजेट याच दोन कंपन्या मैदानात उरल्या आहेत.

    सध्या टाटा आणि स्पाईसजेट यांच्या केवळ तांत्रिक निविदा मंजूर झाल्या आहेत. पुढच्या टप्प्यात त्यांच्या आर्थिक निविदा तपासून पाहिल्या जाणार आहेत. त्यात ज्या कंपनीने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली असेल, त्या कंपनीला एअर इंडियाचा ताबा मिळेल. एअर इंडिया कंपनीवर सध्या भलामोठा कर्जाचा डोंगर आहे. सरकारने वेळोवेळी आर्थिक मदत करूनही कंपनीचं कर्ज वाढतच गेलंय. त्यामुळे सरकारने अखेर ही कंपनी विकून त्यातून आपले हात मोकळे करण्याचा निर्णय घेतलाय.