HDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर

मोबाईल बँकिंग ॲपमध्ये येणारी समस्या सोडवण्यात आली आहे. ग्राहकांना आता नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करता येणार आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व," असं एचडीएफसी बँकेनं ट्विट करत माहिती दिली आहे.

  नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील मोठी बँक HDFC बँकेला पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी HDFC बँकेचं ॲप डाऊन झाल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर बँकेनं आपल्या ग्राहकांना नेट बँकिंगच्या पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. तसंच याद्वारे आपली कामं पूर्ण करण्यास सांगितलं होतं. परंतु आता ही तांत्रिक समस्या दूर करण्यात आल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

  “मोबाईल बँकिंग ॲपमध्ये येणारी समस्या सोडवण्यात आली आहे. ग्राहकांना आता नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करता येणार आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व,” असं एचडीएफसी बँकेनं ट्विट करत माहिती दिली आहे.

  बँकेनं दिलं स्पष्टीकरण

  “मोबाईल बँकिंग ॲपवर काही समस्या जाणवत आहे. प्राधान्यानं आम्ही ही समस्या सोडवण्याचं काम करत आहोत. लवकच आम्ही या संदर्भात माहिती देऊ. ग्राहकांना आपल्या ट्रान्झॅक्शन्ससाठी नेट बँकिंगचा वापर करावा. असुविधेसाठी आम्हाला खेद आहे,” असं बँकेचे प्रवक्ते राजीव बॅनर्जी म्हणाले होते.

  यापूर्वीही काही वेळा HDFC बँकेला तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात एकदा बँकेची नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा अनेक तासांसाठी ठप्प झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता.

  technical problem resolved by hdfc bank banks app can be used again informed twitter