कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; रिझर्व्ह बँकेच्या अहवालात पुष्टी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय अर्थव्यवस्थेला विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन लाख कोटींचा फटका बसला आहे. राज्य स्तरावर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे नुकसान सोसावे लागले असल्याची पुष्टी रिझर्व्ह बँकेच्या अहवालात (आरबीआय) करण्यात आली आहे. या अहवालात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दूरगामी परिणामांचाही आढावा घेण्यात आला आहे. कोरोनावरील लस महत्त्वाचा शोध असला तरी लसीकरणामुळे बचाव करणे अशक्य असल्याचेही नमूद केले आहे. आता कोरोनासोबतच जगण्याची सवय लावावी लागेल, असेही अहवालात नमूद केले आहे.

  दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय अर्थव्यवस्थेला विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन लाख कोटींचा फटका बसला आहे. राज्य स्तरावर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे नुकसान सोसावे लागले असल्याची पुष्टी रिझर्व्ह बँकेच्या अहवालात (आरबीआय) करण्यात आली आहे. या अहवालात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दूरगामी परिणामांचाही आढावा घेण्यात आला आहे. कोरोनावरील लस महत्त्वाचा शोध असला तरी लसीकरणामुळे बचाव करणे अशक्य असल्याचेही नमूद केले आहे. आता कोरोनासोबतच जगण्याची सवय लावावी लागेल, असेही अहवालात नमूद केले आहे.

  तथापि, तिसऱ्या लाटेची शक्यता अद्यापही कायम असून सतर्क राहण्याची गरज असल्याचेही आरबीआयने भाष्य केले आहे. तिसीर लाट रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह लसीकरणही आवश्यक आहे तथापि लसीकरण हाच बचावाचा मार्ग नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल कोरोनाच्या दूरगामी परिणामांबाबत अधिक सतर्क करणारा आहे.

  अहवालातील नोंदी

  • विद्यमान आर्थिक वर्षासाठी विकास दर 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्के झाला आहे.
  • दोन लाख कोटींचे नुकसान ग्रामीण व लहान शहरांच्या मागणी व पुरवठ्यातील अभावामुळे झाले.
  • महागाई वाढण्याची चिंता असली तरी व्याज दरांबाबत कठोर धोरण अंगिकारले जाणार नाही.
  • गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तुलनेत यंदाचे नुकसान कमी आहे.
  हे सुद्धा वाचा