तालिबानने दाखविला रंग! भारतासोबत व्यापार रोखला; भारताची अफगाणिस्तानात कोट्यावधीची गुंतवणुक

तालिबानने पाकिस्तानच्या ट्राँझिट मार्गावरून मालवाहतूक बद केली आहे. यामुळे भारतात वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. तथापि अफगाणिस्तानच्या घटनाक्रमावर नजर असल्याचेही संघटनेने म्हटले. आयात पाकिस्तानमार्गे होत होती. परंतु आता तालिबानने हा मार्गही बंद केला आहे.

    दिल्ली : काबूलवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने(Taliban) भारतासोबत सर्वच प्रकारच्या आयात-निर्यातीला ब्रेक लावला आहे. भारतीय निर्यात संघटनेचे (एफआयईईओ) महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने (Taliban) पाकिस्तानच्या ट्राँझिट मार्गावरून मालवाहतूक बद केली आहे. यामुळे भारतात वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. तथापि अफगाणिस्तानच्या घटनाक्रमावर नजर असल्याचेही संघटनेने म्हटले. आयात पाकिस्तानमार्गे होत होती. परंतु आता तालिबानने हा मार्गही बंद केला आहे.

    भारत अफगाणिस्तानचा (Afghanistan)सर्वात मोठा व्यापार भागीदार देश आहे. दिल्लीहून काबूलला 2021 मध्ये आतापर्यंत 83.5 कोटी डॉलर्स (जवळपास 6262.5 कोटी रुपये) वस्तूंची निर्यात करण्यात आली आहे.

    अफगाणिस्ताननेही भारताकडून जवळपास 51 कोटी डॉलर (जवळपास 3825 कोटी रुपये) वस्तूंची आयात केली आहे. व्यापाराशिवाय भारताने अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूकही केली आहे. देशात भारतातर्फे संचालित 400 प्रकल्पांमध्ये 225 अब्ज रुपयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे.

    अफगाणिस्तानातून गनी सरकार सत्तेबाहेर होताच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तालिबानी दहशतवाद्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानात भ्रष्टाचार वाढला होता हे संपूर्ण जगाला माहिती आहे असा दावा करीत अफगाणिस्तानात शांतता आणि स्थिरतेला पाकिस्तानचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्यावर जर पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची मुक्ताफळेही त्यांनी उधळली. चीन, अमेरिका व ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचाही दावा त्यांनी केला.