आता नोटा छापणार नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

2021-21 दरम्यान भारताच्या जीडीपीत 7.3 टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होताच अर्थव्यवस्था सुधारणेच्या मार्गावर आहे. याशिवाय, आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सहामाहीपासूनच अर्थव्यवस्था संकटातून बाहेर येण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

    दिल्ली : कोरोनामुळे मोडकळीस आलेली भारतीय अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अतिरिक्त नोटा छापण्याचा अर्थतज्ज्ञांनी दिलेला सल्ला केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी, अतिरिक्त नोटा छापण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, असे सोमवारी संसदेत स्पष्ट केले.

    2021-21 दरम्यान भारताच्या जीडीपीत 7.3 टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होताच अर्थव्यवस्था सुधारणेच्या मार्गावर आहे. याशिवाय, आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सहामाहीपासूनच अर्थव्यवस्था संकटातून बाहेर येण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

    सरकारने कोरोना संकटाचा निपटारा करणे, आर्थिक विकासाला गती देणे आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत 29.87 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती, असे सीतारामण यांनी सांगितले.