tv ac fridge cost likely to go up by 20 percent vb
२०% पर्यंत भडकणार आहेत 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती; जाणून घ्या यामागचा झोल

या वस्तू तयार करण्यासाठी तांबे, झिंक, ॲल्युमिनियम, स्टील, प्लास्टिक आणि फोमिंग फोमिंग एजंट्स यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या वस्तू खूप महागल्या आहेत. सागरी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीच्या भाड्यात ४०-५० टक्क्यांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही या फेस्टिव सीझनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर असलेली सूट पदरात पाडून घतली नसेल तर आता हा व्यवहार तुमच्या खिशावरचा ताण वाढविणार आहे. लवकरत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशन, मायक्रोवेवच्या किंमती २० टक्क्यांनी भडकणार आहेत. अशातच तुम्ही एखादी वस्तू खरेदी करणार असाल तर त्वरा करा नाही तर याच वस्तूंसाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

तथापि, या उत्पादनांच्या किंमतीत १५-४० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते फेस्टिव्ह सीझनमध्ये चांगला धंदा झाला आणि जुना स्टॉकही संपला आहे. नव्या वस्तूंच्या किंमतीत अचानक वाढ झाली आहे, ज्याचा मागणीवरही परिणाम होणार आहे. नव्या तिमाहीत मागणीत झालेल्या घसरणीवर थेट परिणाम पाहायला मिळणार आहे. पण आपल्याकडे दुसरा मार्गच नाहीये.

ही उत्पादने तयार करण्यासाठी तांबे, झिंक, ॲल्युमिनियम, स्टील, प्लास्टिक आणि फोमिंग एजंट्स यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या वस्तूंच्या किंमती चांगल्याच भडकल्या आहेत.सागरी मार्गाने येण्याऱ्या वस्तूंच्या भाड्यात ४०-५० टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्लोबल शॉर्टेजमुळे टेलिव्हिजन पॅनलच्या किंमती १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, फेस्टिव्ह सिझन दरम्यान या वाढलेल्या किंमती आम्ही ग्राहकांवर लादल्या नाहीत. पण आता आम्हाला या किंमती वाढविण्या वाचून गत्यंतरच नाही. किंमती वाढविल्याने आलेल्या मागणीत घसरण होण्याची दाट शक्यता आहे. अनेक वर्षांनंतर किंमतीत अचानक वाढ झाली आहे.