Underworld don Dawood Ibrahim's property auctioned for Rs 1 crore 10 lakhs vb
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) संपत्तीचा १ कोटी १० लाखांत लिलाव

बोली न लावताच दाऊदच्या (Dawood Ibrahim) या संपत्तीचा (property) १ कोटी १० लाख रुपयात लिलाव (Auction) करण्यात आला. रत्नागिरीचे (ratnagiri) रहिवासी रवी काटे (ravi kate) यांनी दाऊदची ही वडिलोपार्जित संपत्ती (Ancestral property) विकत घेतली. काटे यांनी अर्जासोबत २७ लाख ५० हजार रुपये अनामत म्हणून जमा केले होते.

  • रत्नागिरी स्थित व्यक्तीने विकत घेतली दाऊदची संपत्ती

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क , मुंबई.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची रत्नागिरी स्थित वडिलोपार्जित संपत्तीचा १ कोटी १० लाख रुपयांत लिलाव झाला. रत्नागिरी स्थित व्यक्तीने दाऊदची संपत्ती खरेदी केली आहे. फेमा अंतर्गत बोली न लावताच दुसऱ्यांदा अशाप्रकारे संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे.

बोली न लावताच झाला लिलाव

स्मगलर्स अँड फॉरेन मॅनीपुलेटर्स ॲक्ट (फेमा) ने दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी स्थित वडिलोपर्जित संपत्तीची किंमत १ कोटी ९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दोन जणांनी संपत्तीच्या लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. १ डिसेंबरला लिलावाच्या दिवशी एक व्यक्तीने काही तांत्रिक कारणामुळे आपला अर्ज मागे घेतला म्हणून बोली न लावताच दाऊदच्या या संपत्तीचा१ कोटी १० लाख रुपयात लिलाव करण्यात आला. रत्नागिरीचे रहिवासी रवी काटे यांनी दाऊदची ही वडिलोपार्जित संपत्ती विकत घेतली. काटे यांनी अर्जासोबत २७ लाख ५० हजार रुपये अनामत म्हणून जमा केले होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने झाला लिलाव

दाऊदच्या संपत्तीचा ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबईत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. फेमा अंतर्गत लिलाव करण्यासाठी कोणीही बोली लावण्यास पुढे आला नाही, असं दुसऱ्यांदा घडलं आहे. यापूर्वी ३ कोटी ४५ लाख रुपये किंमतीची ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीच्या सांताक्रुझ येथील फ्लॅटचा लिलावासाठी बोली लावण्यासाठी कोणीही पुढे आलं नव्हतं.

नोव्हेंबरमध्ये होणार होता या संपत्तीचा लिलाव

या संपत्तीत ८० गुंठे जमिनीचा समावेश आहे, यासह अन्य सहा संपत्तीचा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार होता. त्यावेळी फेमामध्ये तांत्रिक अडचण आल्याची माहिती मिळाली होती, यामुळे त्यावेळी हा लिलाव होऊ शकला नाही.

६ संपत्तीचा यापूर्वीच झाला आहे लिलाव

गेल्या महिन्यात दाऊदच्या सात संपत्तीचा लिलाव झाला आहे. दाऊदची संपत्ती विकत घेतलेले वकिल अजय श्रीवास्तव यांनी यावेळी दाऊदची संपत्ती विकत घेतली होती. तर वकिल भूपेंद्र भारद्वाज यांनी दाऊद इब्राहिम याच्या चार संपत्ती विकत घेतल्या आहेत. मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटानंतर दाऊदला फरार घोषित करण्यात आले आहे.