Cycle Pure Agarbatti तर्फे गणेश चतुर्थीसाठी वेदिक परंपरा पूजा किटचे अनावरण

अगरबत्तीपासून ऐरास्‍पेसपर्यंतचा समूह एनआर ग्रुपचा भाग असलेली कंपनी सायकल प्‍युअर अगरबत्तीज गणेशोत्‍सवानिमित्त संपूर्ण गणेश पूजा किट सादर करत आहे.

मुंबई : अगरबत्तीपासून ऐरास्‍पेसपर्यंतचा समूह एनआर ग्रुपचा भाग असलेली कंपनी सायकल प्‍युअर अगरबत्तीज गणेशोत्‍सवानिमित्त संपूर्ण गणेश पूजा किट सादर करत आहे. ब्रॅण्‍ड महामारीमुळे सुलभपणे प्रार्थना करण्‍याचा अनुभव मिळण्‍यासाठी वर्क फ्रॉम होम प्रमाणे ‘प्रे फ्रॉम होम’ देखील सादर करत आहे. त्‍यांनी उत्‍सवादरम्‍यान ग्राहकांना त्‍यांच्‍या घरामधूनच सुरक्षितपणे प्रार्थना करता येण्‍यासाठी खास पूजा किट्स तयार केले आहे. सायकल प्‍युअर पूजा किट्स उत्‍पादन रेंज उत्‍सवाचा उत्‍साह व प्रार्थना अखंडित राहण्‍याच्‍या खात्रीसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

यंदा दहा दिवस साजरा केला जाणारा गणेशोत्‍सव २२ ऑगस्‍ट २०२० पासून सुरू होणार आहे. यंदाचा गणेशात्‍सव अधिक खास बनवण्‍यासाठी सायकल प्‍युअर अगरबत्तीजने खास संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट तयार केले आहे. या उत्‍सवाला अधिक खास बनवण्‍यासाठी आणि या महामारीदरम्‍यान प्रार्थना करण्‍याची परंपरा अखंडित ठेवण्‍यासाठी ब्रॅण्‍ड २२ ऑगस्‍ट रोजी त्‍यांच्‍या अधिकृत फेसबुक पेजवर लाइव्‍ह पूजेचे आयोजन केले आहे.

संपूर्ण गणेश चतुर्थी पॅकबाबत बोलताना सायकल प्‍युअर अगरबत्तीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. अर्जुन रंगा म्‍हणाले, ”आम्‍ही भक्‍तांना परमात्‍म्‍याशी जोडतो. आमची उत्‍सवांदरम्‍यान लोक पूर्वीपासून करत असलेल्या प्रार्थनेची परंपरा सुरू ठेवण्‍याची इच्‍छा आहे. पण हे सर्व त्‍यांच्‍या घरामधून सुरक्षितपणे. म्‍हणूनच आम्‍ही सर्व प्रमुख उत्‍सव व प्रसंगांसाठी खास पूजा किट्स तयार केले आहे. हे खास पूजा किट्स वेदांनुसार डिझाइन करण्‍यात आले आहे. महामारीदरम्‍यान आणि त्‍यानंतरच्‍या काळादरम्‍यान तसेच या आधुनिक काळामध्‍ये प्रार्थनेची वेदिक परंपरा अखंडित ठेवण्‍यासाठी या किट्समध्‍ये सर्व प्रार्थना साहित्य असणार आहे.”

”पूजा किट स्‍कंद पुराणाप्रमाणे पायरी-पायरीने परिपूर्ण गणेश पूजेचा अनुभव देते. पूजा करण्‍याचा विधी तज्ञ विद्वान व पुजारी यांच्‍या मार्गदर्शनासह देण्‍यात आला आहे. पॅकमध्‍ये पूजेची साधी, पण परिपूर्ण प्रक्रिया आहे. किटमध्‍ये विसर्जनासाठी पर्यावरणास अनुकूल गणेश मूर्ती, हरिद्रा, कुंकू, अक्षता, यज्ञोपवीत, कलश, संब्रानी, दिवा, गंगाजल, दीपम, चंदन, पूजा बेल, पूजा बेलसाठी पीठा, पूजा अक्षता, अगरबत्ती, अगरबत्ती धारक, गंगाजलसाठी भांडे, चमचा, तीर्थासाठी भांडे, पुगली फल, शेंदूर, वस्त्र, कापूर, कापूर ठेवण्‍यासाठी भांडे, संब्रानी धरण्‍याचे भांडे यांचा समावेश आहे.

किटमध्‍ये ब्रॅण्‍डच्‍या दर्जात्‍मक खात्रीदायी उत्‍पादनांसह भक्‍तांना पूजा विधी करण्‍यामध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने मार्गदर्शन करणा-या सूचनात्‍मक सीडीचा समावेश आहे. पॅक या हंगामामध्‍ये शुभ सण साजरा करणारे घरापासून दूर राहणारे तरूण असोत, कार्यरत किंवा घरीच असणा-या माता, गृहिणी असोत किंवा पहिल्‍यांदाच उत्‍सवाचा एकत्र आनंद घेणारे नवविवाहित जोडपे अशा प्रत्‍येक ग्राहकाच्‍या सर्व पूजासंदर्भातील गरजांची पूर्तता करते.

५९९ रूपये किंमत असलेले पूजा पॅक्‍स उपलब्‍ध असून www.cycle.in या वेबसाइटच्‍या माध्‍यमातून खरेदी करता येऊ शकतात.

सुरक्षितपणे खरेदी करा: https://www.cycle.in/sampoorna-Ganesha-chaturthi-pooja-kit

सुरक्षितपणे प्रार्थना करा: २२ ऑगस्‍ट रोजी सकाळी ७.३० वाजता पुजेचे थेट प्रक्षेपण पाहा.