मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागांतील ‘व्हीआयचे’ नेटवर्क गुल; ग्राहक झाले त्रस्त

मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) जिल्ह्यासह काल बुधवारपासून राज्यातील काही भागांत कोसळधार (heavy Rain) पावसाला सुरूवात झाली आहे. या कोसळधार पावसामुळे आयडीया-व्होडाफोनचे (VI) नेटवर्क (Network) आज सकाळपासून गुल झाले आहेत. त्यामुळे ग्राहक खूप संतापले आहेत. तसेच कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने (#vodafoneindia ) हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर (Trending) आहे.

पुण्यातील काही ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रार केल्या आहेत. मात्र, त्यांना कंपनीने लवकरच सुरु केले जाईल, तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर दिले आहे. मात्र, आज दुपारपर्यंत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाट पहावी लागली आहे. पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे. परिक्षार्थिंची मोठी अडचण झाली आहे. सध्या राजभरातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू आहेत. व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.