घर घ्यायचंय पण, ठरत नाहीये; आता शोध थांबवा–सर्व नजरा वसिंद, ठाणे जिल्ह्यावर केंद्रीत

घर खरेदीदारांच्या नव्या वर्गासाठी हे ठिकाण दर्जेदार जीवन, कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा यांचे आकर्षक केंद्र म्हणून उदयास येत आहे. हे ठिकाण चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहेच, शिवाय शहरी धकाधकीपासून थोडे लांब असल्यामुळे तिथे या दोन्ही विश्वांचा सर्वोत्तम अनुभव घेता येतो. थोडक्यात सांगायचे तर, नैसर्गिक वातावरणातले शहरी आयुष्य इथे जगता येते.

  • कनेक्टिव्हिटी आणि विकासामुळे वसिंद, एमएमआरमधील निवासी मालमत्तेत वाढ
  • वसिंद आता मुंबईतील संभाव्य लोकप्रिय हाऊसिंग हब होण्याच्या वाटेवर
  • ठाणे जिल्ह्यात धोरणात्मक जागी वसलेले हे ठिकाण नव्या युगातील ग्राहकासाठी सर्वार्थाने लाभदायक

मुंबई : शांतता, चांगली हवा, दूरवर पसरलेली हिरवाई आणि आगामी पायाभूत सुविधा…वसिंदकडे पाहिल्यानंतर नव्या घर- खरेदीदाराच्या मनात हेच शब्द येतात. वसिंद हे ठाणे जिल्ह्यातील आगामी आणि आश्वासक हब आहे. नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत ठाणे जिल्ह्यातील वसिंद अव्वल दर्जाचे ठरत आहेच, पण त्याबरोबर इथे कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य मेळ घालण्यात आला आहे.

घर खरेदीदारांच्या नव्या वर्गासाठी हे ठिकाण दर्जेदार जीवन, कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा यांचे आकर्षक केंद्र म्हणून उदयास येत आहे. हे ठिकाण चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहेच, शिवाय शहरी धकाधकीपासून थोडे लांब असल्यामुळे तिथे या दोन्ही विश्वांचा सर्वोत्तम अनुभव घेता येतो. थोडक्यात सांगायचे तर, नैसर्गिक वातावरणातले शहरी आयुष्य इथे जगता येते.

ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत असताना तसेच घरून काम करण्याची संस्कृती झपाट्याने पसरत असताना लोक आता केवळ मूलभूत सुविधांच्या शोधात नाहीत, तर त्यांना प्रदूषणमुक्त वातावरणसुद्धा हवे आहे. कनेक्टिव्हिटीच्या सोयीशी तडजोड करायची त्यांची तयारी नाही. अशा अपेक्षांमध्ये वसिंद चपखलपणे बसतं. भातसा नदीच्या काठावर वसलेलं हे ठिकाण हिरवाईने नटलेले डोंगर, सुंदर देवळे आणि घर व कामाचा समतोल साधण्याचं आश्वासन देणारं आहे.

कमल खेतान, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सनटेक रियल्टी म्हणाले, “वासिंद एक प्रगतीशील निवासी रिअल्टी मार्केट मध्ये विकसित झाले असून आजच्या महत्वाकांक्षी गृह खरेदीदाराचे राहणीमान तसेच कामाचे कल्चर दोन्ही सुधारले आहे तसेच मुंबई MMR मधील हे निवासी केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. मागील काही वर्षांमध्ये शाश्वत वाढ होत असून चांगली कनेक्टिव्हिटी, मानवी संसाधनांचा अखंड प्रवाह, भरभराटीचा समुदाय आणि बिजनेस सेटलमेंट यामुळे या स्थानाला महत्व प्राप्त झाले आहे. आजचे घर खरेदीदार असे स्थान शोधत आहेत जे परवडणारेअसेल आणि त्यांना संधीही प्रदान करेल त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्यही उत्तम ठेवेल अशा सर्व गरजा वासिंद पूर्ण करेल. असा हा आमचा ४० एकरचा प्रकल्प उदयोन्मुख खरेदीदाराच्या गरजा पूर्ण करणे सुरू ठेवेलच त्याचबरोबर आजच्या जीवनशैलीला पूरक आणि वर्क फ्रॉम होमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा असा नियोजित प्रकल्प असून ग्रोथ वेक्टरच्या बाजूने स्ट्रॅजिक लोकेशनणांवर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे वेगळे विकास तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करेल.”

सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी – वसिंद हे ठिकाण कल्याणपासून केवळ पाच स्टेशन्स दूर आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीला चांगल्या प्रकारे जोडलेले हे ठिकाण सेंट्रल रेल्वे लाइनवर कल्याण आणि कसारा स्टेशनदरम्यान येते. एनएच३ द्वारे ते मुंबई आणि नाशिकला रस्तेमार्गाने जोडलेले आहे. वडोदरा आणि एमएमआरलाला जेएनपीटी येथे जोडणारा आगामी आठ- पदरी एक्सप्रेसवे मुंबई- नाशिक महामार्गावरून जाणारा असून ते वसिंदपासून केवळ १७ किलोमीटर अंतरावर आहे.

हा एक्सप्रेसवे पुढे कल्याण- मुरबाड रस्ता आणि मल्टी मोडाल कॉरिडॉर यांना जोडणार असल्यामुळे मुंबईच्या बाह्य उपनगरांशी जोडला जाईल. प्रस्तावित आउटर लिंक रस्ता मुंबई नाशिक हायवेवर पाडाघर येथे सुरू होतो आणि उल्हास नगर व अंबरनाथमार्गे सायन पनवेल एक्सप्रेसवेला जोडला जातो.

रोजगार संधींचे केंद्र – आतापर्यंत या परिसरात केवळ जेएसडब्ल्यू प्लँट आणि इतर एमएसएमई युनिट्स कार्यरत होती. मात्र, आता इथे विविध एसएमईज, उत्पादन प्लँट्स, गोदामे, लॉजिस्टिक पार्क्स मुंबई- नाशिक महामार्गाच्या बाजूने उदयास आलेली आहेत. अमेझॉन, गोदरेज, मिंत्रा, डी- मार्ट, महिंद्रा आणि रिलायन्स अशा मोठ्या ब्रँड्सनीही आपले दालने सुरू केलेली आहेत. वाढत्या व्यवसायामुळे या परिसरातील रहिवाशांसाठी रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील.

वसिंदमध्ये पाहिजे ते – भात्सा नदी आणि तिच्या उपनद्यांद्वारे वसिंदला पाणीपुरवठा होतो. या शहरात दर्जेदार शिक्षण पुरवणाऱ्या विविध संस्था आहेत तसेत नजीकची हॉस्पिटल्स व दवाखाने अहोरात्र सुरू असतात. कोणत्याही कुटुंबाला लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा, मग ते शॉपिंग सेंटर असो, बँक असो किंवा मनोरंजनाची ठिकाणे, एफ अँड बी दालने, स्टारबक्स, मॅकडोनाल्ड्स, शिव सागर इत्यादी गरजा इथे केवळ २० मिनिटांच्या अंतरात भागवल्या जातात.

इतकेच नाही, तर अध्यात्माची आवड असलेल्यांसाठी इथे ध्यानधारणा केंद्रही आहे. पश्चिम घाटात सुमारे १०० विविध जातीचे पक्षी व झाडांमध्ये वसलेल्या वसिंदचे निसर्गसौंदर्य या ठिकाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हवेच्या सर्वोत्कृष्ट दर्जाविषयी वेगळे काही सांगायलाच नको, कारण इथली हवा एमएमआरमधील इतर ठिकाणांपेक्षा जास्त चांगली असल्याचे संशोधनाअंती दिसून आले आहे.

महत्त्वाकांक्षी जीवनशैली तुमच्या प्रतीक्षेत – घर खरेदीसाठी वसिंदला पसंती देणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून त्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हे ठिकाण ठाण्यापेक्षा तिपटीने, तर कल्याणपेक्षा दुपटीने परवडण्यायोग्य आहे.

२६ लाख चौरस फुटांचा आगामी ब्रँडेड निवासी प्रकल्प इथल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राची समीकरणे नव्याने प्रस्थापित होतील. या ठिकाणी लवकरच मिनी- बूम येईल असा ठाम अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या दशकात ठाणे आणि कल्याणमध्ये अनुक्रमे रू. ९३९१ रुपये आणि रू. ५०८८ रुपयांची मोठी वाढ प्रती चौरस फूट (पीएसएफ) पाहायला मिळाली. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वसिंद हे नवे केंद्र म्हणून उदयास येत असून पुढच्या दशकात या ठिकाणाचा लक्षणीय विकास होईल अशी चिन्हे आहेत.

कॉरिडॉर्स, लिंक रोड, बायपास रस्ते व प्रस्तावित नव्या मेट्रो लूप्स या ठिकाणी नियोजन केले जात असून त्यामुळे पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल. त्याचबरोबर विकास केंद्रे आणि औद्योगिक केंद्रेही प्रस्तावित आहेत. अशा विकासासह वसिंदची यशोगाथा आत्ता कुठे सुरू होत आहे!