What to do during muhurat trading what not to do
मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान काय करावे, काय करु नये? हे ध्यानात घेतल्यास गुंतवणूक करणे अधिक सोयीचे होईल

दिवाळी (Diwali) हा प्रकाशोत्सव भारतातील पवित्र सणांपैकी एक आहे. त्यामुळे व्यवसाय तसेच मार्केटिंग समुदायासह (business and marketing) प्रत्येकासाठी या सणाचे वेगळे महत्त्व असते. दिवाळीच्या सणाला ट्रेडिंगला (trading) सुट्टी असते. मात्र एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) दोन्हीही संध्याकाळी ट्रेडिंग सेशनसाठी (Trading Session) विशेष भत्ते देतात. हे व्यापारी सत्र ‘मुहूर्त ट्रेडिंग (muhurat trading) म्हणून ओळखले जाते.

दिवाळी हा प्रकाशोत्सव भारतातील पवित्र सणांपैकी एक आहे. त्यामुळे व्यवसाय तसेच मार्केटिंग समुदायासह प्रत्येकासाठी या सणाचे वेगळे महत्त्व असते. दिवाळीच्या सणाला ट्रेडिंगला सुट्टी असते. मात्र एनएसई आणि बीएसई दोन्हीही संध्याकाळी ट्रेडिंग सेशनसाठी विशेष भत्ते देतात. हे व्यापारी सत्र ‘मुहूर्त ट्रेडिंग म्हणून ओळखले जाते. यावेळी संपत्ती व समृद्धीची देवी असलेल्या लक्ष्मीचे पूजन केले जाते.

या शुभ पर्वात शेअर बाजारात व्यापार केल्यास भविष्यात समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते, असा समज आहे. त्यामुळे, मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान काय करावे व काय करू नये, याविषयी सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ प्रभाकर तिवारी.

काय करावे?

१. मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान इक्विटी मार्केटमध्ये प्रवेश करणे:

इक्विटी बाजारात प्रवेश कधी करायचा, हा गुंतवणुकदारांसमोर नेहमीच उभा राहणारा प्रश्न आहे. तुम्ही नवीन गुंतवणूकदार असलात तरीही इक्विटीमध्ये प्रवेश करणे योग्य निर्णय आहे. गुंतवणूकदार टोकन ऑर्डर देऊन आणि उच्च संभाव्य आरओआय असलेल्या शेअर्सची खरेदी करतात, यामुळे बाजाराला व्यापून जातो. म्हणजेच, याचा अर्थ असा की या शुभ दिवशी बाजारपेठ कमी अस्थिर असते. कारण व्यापारी स्टॉक विकण्याऐवजी खरेदी करण्याचा प्राधान्य देतात.

तुम्ही टोकन खरेदी करुन तुमचा प्रवेश करू शकता. दिवाळीच्या काळात नवी सुरुवात करतात, त्यामुळे आर्थिक शिस्त लावून घेतल्यास याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतील. तुम्हाला प्रत्येक तिमाही, मासिक किंवा दैनंदिन स्तरावर गुंतवणुकीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. इक्विटी, कर्ज, सोने किंवा रिअल इस्टेटमधील पोर्टपोलिओाठी नियमितपणे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे.

२. ग्रामीण- वापर केंद्रीत स्टॉक खरेदी करणे:

विशेष म्हणजे, खप-आधारीत कंपन्यांसह, विशेषत: एफएमसीजी आणि दुचाकी क्षेत्रात गुंतवणुकीत वृद्धीचा वेग जास्त असतो. किंमत युद्धे सुरु होतात, टॉप लाइन वाढीस प्रोत्साहन मिळते आणि दुप्पट संख्येने वृद्धी दर मिळतो. जीएसटी अंमलबजावणीमुळे या स्टॉकमध्ये अतिरिक्त अल्फा लेअरची भर पडली. म्हणजेच, येत्या काही वर्षांत याच्या वाटपाच्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात सुधाराणा होतील. असे म्हणतात की, खाद्य कंपन्यांचे मूल्यांकन जास्त असूनही जीएसटी खाद्य कंपन्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांची भरभराट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वापर आधारीत क्षेत्र, त्यासंबंधी उपक्षेत्रावर लक्ष दिले पाहिजे. उदा. ग्रामीण भागातील वापर होणाऱ्या कंपन्या. उत्पादन खर्जाच्या १५० टक्के किंमतीवर एमएसपी निश्चित केली आहे. तसेच एमएसपीच्या लाभात रब्बी पिकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण क्रयशक्तीत वाढ झाली आहे. म्हणून इनपुट-एंडवर व्यवहार करणा-या कंपन्यांकडे अधिक बारकाईने पाहणे आवश्यक आहे. उदा. संकरित बियाणे, ठिबक सिंचन, खते आणि कृषी रसायने इत्यादी.

काय करु नये?

१. चांगले भविष्य देण्याच्या आश्वासनात वहावत जाणे:

गुंतवणुकीच्या जगात, आपल्या मतावर ठाम राहणे आवश्यक आहे. मनात वास्तववादी चौकट कायम ठेवणे, हा त्यावरील उपाय आहे. भविष्यात समृद्धीची आश्वासने देणा-या गर्दीकडे वहावत न जाणे उत्तम ठरेल. मुहूर्त ट्रेडिंग हा गुंतवणुकीच्या करिअरमधील एक आशादायी अध्याय आहे. मात्र ‘शुभ’ या शब्दानेच केवळ भविष्य उत्तम ठरेल, असे नसते. किंवा या दिवसाच्या सकारात्मकतेमुळेच योग्य हिशोब न करताही तुम्हाला वर्षभर चांगले परतावे मिळतील, अशी आशा करणेच चुकीचे आहे.

याच प्रकारे, या दिवसाची गतिमानता जास्त असूनही, तुम्ही सखोल संशोधन केले पाहिजे. तसेच दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याच्या मॉडेलसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल घडवण्यासाठी आर्थिक तज्ञ किंवा व्यवस्थापकांचे मार्गदर्शन घ्यावे.

२. मोठी जोखीम घेणे:

मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान तरलतेच्या मर्यादांची अडचण होते. त्यामुळे विशिष्ट स्टॉकमध्ये जास्त जोखीम घेऊ नये, याचे संकेत मिळतात. या सत्रादरम्यान, देशांतर्गत बाजारपेठ फक्त एका तासासाठी व्यापाराकरिता खुली असते. याचा अर्थ, सहभाग खूप कमी असेल, त्यामुळे तरलतेच्या स्थितीत अस्थिरता येईल. एक गुंतवणूकदार म्हणून, आपण या बाजारात शेअर्स घेणे व खबरदारीपूर्वक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

यामुळेच, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी आपण कोणत्याही स्टॉकमध्ये जोखीम घेण्यापूर्वी दोन वेळा विचार केला पाहिजे. खर तर, जोखिमीच्या बाबतीत एक्सचेंजकडून तुमच्यावर कोणतेही बंधन नसेल. मात्र याचा अर्थ आपण मोठी जोखीम घेणे योग्य नाही. त्यामुळे इप्सित संयमासाठी योग्य आणि हिशोबशीर निर्णय घेणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे.

नव्या गुंतवणुकदारांना बाजारात प्रवेश करण्यासाठी मुहूर्त ट्रेडिंग ही योग्य वेळ आहे. आपण नवशिके असाल तर, टोकन खरेदी करणे हे योग्य धोरण ठरेल. वर्षातील ही वेळ व्यापार/गुंतवणुकीच्या बाबतीत करिअरचा विचार करणा-यांसाठी एक आदर्श प्रवेश बिंदू आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या खेळाडूंसाठी मुहूर्त ट्रेडिंग हा आणखी एक आदर्श आहे. चक्रीय परिणाम आपल्याला महत्त्वाचे वाटत असतील आणि कमी तरलतेचा विचार असल्यास दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ही वेळ अधिक महत्त्वाची आहे. एकूणच, हा शुभ मुहूर्त असून नवीन प्रवास सुरु करण्यासाठी योग्य वेळदेखील आहे.