शाओमीने लाँच केला स्मार्ट ओव्हन, जाणून घ्या

या प्रोडक्टचे नाव MIJIA Smart Oven असे आहे. या नवीन मीजिया स्मार्ट ओव्हनची क्षमता ३० लीटरची आहे. हे व्हर्टिकल बॉडी डिझाईनसोबत येते. वेगवेगळ्या प्रमाणे यात कुकिंग मोड देण्यात आले आहे. तसेच यामध्ये रोस्टिंग, स्टीमिंग, फ्राईंगचा देखील समावेश असल्याचे शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.

नवी दिल्लीः शाओमी कंपनीने स्मार्ट ओव्हनचं एक नवीन प्रोडक्ट लाँन्च केलं आहे. या प्रोडक्टचे नाव MIJIA Smart Oven असे आहे. या नवीन मीजिया स्मार्ट ओव्हनची क्षमता ३० लीटरची आहे. हे व्हर्टिकल बॉडी डिझाईनसोबत येते. वेगवेगळ्या प्रमाणे यात कुकिंग मोड देण्यात आले आहे. तसेच यामध्ये रोस्टिंग, स्टीमिंग, फ्राईंगचा देखील समावेश असल्याचे शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.

या प्रोडक्टची क्राउडफंडिंग २६ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे. कंपीनीची योजना या स्मार्ट ओव्हनला क्राउड फंडिंगद्वारे १२९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास १४ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. तसेच याचे रिटेल किंमत १४९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास १६ हजार रुपये आहे.

शाओमीचा MIJIA स्मार्ट ओवन सिंगल कलर बॉडी मध्ये येतो. याशिवाय स्टीम आऊटपूटसाठी ३० सेकंदाचा स्ट्यूंइंग दिला आहे. तसेच हा प्रोडक्ट एक स्मार्ट लिंकला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे या प्रोडक्टची डिझाईन जबरदस्त आहे.