वावड्या उठल्या, धुरळा उडाला पण घडलं काहीच नाही अन् निघाला फुसका बार; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार व भत्ते वाढीबाबत नवा खुलासा

केंद्रीय कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनातील डियरनेस अलाऊन्स (DA) व डियरनेस रिलीफ (DR) भत्ते वाढविण्यासंदर्भात काल (शनिवारी) दिल्लीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता व थकबाकी देण्यासंदर्भात मोठी चर्चा झाली.

  नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार व भत्ते १ जुलैपासून वाढणार असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आली होती. मात्र, आता याबाबत वेगळीच माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद औट घटकेचाच ठरण्याची शक्यता आहे.

  केंद्रीय कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनातील डियरनेस अलाऊन्स (DA) व डियरनेस रिलीफ (DR) भत्ते वाढविण्यासंदर्भात काल (शनिवारी) दिल्लीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता व थकबाकी देण्यासंदर्भात मोठी चर्चा झाली.

  दरम्यान, बैठकीनंतर केंद्र सरकार १ जुलैपासून कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते वाढवणार असल्याच्या पोस्टस् सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. त्यासाठी केंद्रीय अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठीचा दाखला दिला जात होता.

  चिठ्ठीत म्हटले होते, की सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबितभत्ते (DA आणि DR) केंद्र सरकार १ जुलैपासून पुन्हा सुरु करणार आहे. हे भत्ते प्रलंबित असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सची जमा झालेली थकबाकीही अदा केली जाईल. केंद्र सरकार तीन टप्प्यात ही थकबाकी देणार असल्याचे नमूद केले होते.

  दरम्यान, काही वेळानंतर #PIBFactCheck मध्ये ही चिठ्ठी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. केंद्र सरकारने अद्याप कर्मचाऱ्यांचे भत्ते किंवा थकबाकीसंदर्भात कोणतीही घोषणा केली नसल्याचे त्यानंतर समोर आले. कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे PIB कडून स्पष्ट करण्यात आले.

  regarding increase in salaries and allowances of crntral government employees new revelation know the details