सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे आजची किंमत ?

MCX गोल्डनुसार सोमवारी सोन्याचे दर १० ग्रॅम ४७ हजार ८ रुपयांवर होते. पण आज सोन्याच्या दरांत १२० रूपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर ४६ हजार ८९० रूपयांभोवती फिरत आहेत. 

    मुंबई : मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचे दर हे ४९ हजार रूपयांवर पोहोचले होेते. पण आता सोन्याचे दर हे ४७ हजार रूपयांपर्यंत घसरले आहेत. म्हणजेच जून महिन्यात सोन्याचे दर हे २ हजार रूपयांनी घसरले आहे. तर चांदीत देखील कमालीची घट झाली आहे.

    दोन आठवड्यांपूर्वी चांदीचे दर पाहिले असता, चांदी ७२ हजार रूपये प्रतिकिलोवर गेली होती. परंतु आज चांदीचे दर ६८ हजारांवर पोहोचले आहेत. म्हणजेच चांदीच्या दरात सुद्दा जून महिन्यात ४ हजार रूपयांनी घट झाली आहे.

    MCX गोल्डनुसार सोमवारी सोन्याचे दर १० ग्रॅम ४७ हजार ८ रुपयांवर होते. पण आज सोन्याच्या दरांत १२० रूपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर ४६ हजार ८९० रूपयांभोवती फिरत आहेत.

    गेल्या आठवड्याचे सोन्याचे दर
    बुधवार            ४७  हजार ७२ रूपये
    गुरूवार            ४६ हजार ८७० रूपये
    शुक्रवार           ४६ हजार ९२५ रूपये