अदानी ग्रुप Cleartrip मध्ये गुंतवणूक करणार, Flipkart बरोबरची धोरणात्मक भागीदारी आणखी विस्तारणार

या गुंतवणुकीतून अदानी समूह आणि फ्लिपकार्ट ग्रूप यांच्यातली धोरणात्मक भागीदारी आणखी वृद्धिंगत होणार असून दोन्ही समूह भारतीय ग्राहकांना डिजिटल सेवा-उत्पादनांची व्यापक मालिका उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. या गुंतवणुकीचा भाग म्हणून क्लियरट्रिप अदानी समूहाचे ओटीए भागीदार म्हणूनही काम करणार आहेत.

  • सहयोगामुळे ग्राहकांना विस्तृत उत्पादन मालिका आणि सेवा पर्यायांच्या माध्यमातून प्रवासाचा सुसूत्र अनुभव मिळणार

अहमदाबाद : भारतातील सर्वात वेगाने वाढणारा वैविध्यपूर्ण उद्योगसमूह असलेल्या अदानी समूहाने (Adani Group) नुकतीच अशी घोषणा केली आहे की हा समूह क्लियरट्रिप प्रायव्हेट लिमिटेड (Cleartrip Pvt Ltd) या ऑनलाइन प्रवास सुविधा कंपनीतील गुंतवणुकीच्या माध्यमातून (ऑनलाइन ट्रॅव्हल ॲग्रिगेटर- ओटीए) तसेच फ्लिपकार्ट (Flipkart) ग्रुप या भारतातील देशांतर्गत विकसित झालेल्या, ग्राहकांना इंटरनेटच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या समूहाच्या काही भागांत गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा भाग म्हणून अदानी समूह क्लियरट्रिपमधील लक्षणीय अल्पसंख्य भागभांडवल संपादित करणार आहे.

भारतातील प्रवास व पर्यटन उद्योग पुन्हा उसळी घेण्याच्या बेताला असताना या गुंतवणुकीच्या माध्यमातून अदानी समूह (Adani Group) आणि फ्लिपकार्ट समूह (Flipkart Group) यांच्यात निर्माण होणाऱ्या समन्वयातून ग्राहकाला अधिक उत्तम दर्जाच्या प्रवासानुभवाचा लाभ होईल. फ्लिपकार्ट समूहाने संपादन केल्यापासून क्लियरट्रिपच्या फ्लाइट बुकिंग्जमध्ये दहापटींनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर अदानी एअरपोर्ट्सवर निदर्शनाला आलेल्या ट्रेण्डनुसार विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढली असून ती आता कोविडपूर्व काळातील संख्येशी बरोबरी साधू लागली आहे. या भागीदारीतून क्लियरट्रिप डिजिटल सीमा ओलांडण्यास सक्षम बनेल आणि संपूर्ण-परिपूर्ण ऑनलाइन प्रवाससेवा पुरवेल.

या गुंतवणुकीतून अदानी समूह आणि फ्लिपकार्ट ग्रूप यांच्यातली धोरणात्मक भागीदारी आणखी वृद्धिंगत होणार असून दोन्ही समूह भारतीय ग्राहकांना डिजिटल सेवा-उत्पादनांची व्यापक मालिका उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. या गुंतवणुकीचा भाग म्हणून क्लियरट्रिप अदानी समूहाचे ओटीए भागीदार म्हणूनही काम करणार आहेत.

क्लियरट्रिपकडील गरजेनुसार विस्तारक्षम असलेले तंत्रज्ञान, वापरकर्ता-स्नेही इंटरफेस आणि उद्योगात सर्वप्रथम असलेले पुढाकार यांच्या बळावर हा भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रॅव्हल ब्रँड्सपैकी एक बनला आहे. याचबरोबर, अनुभवी वरिष्ठांची टीम व फ्लिपकार्टकडे असलेला अतिशय सखोल ग्राहककेंद्री अनुभव यांच्या बळावर कंपनीने गेल्या काही महिन्यांत ओटीए क्षेत्रातील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. प्रवाससंबंधित उत्पादने, लॉयल्टी प्रोग्राम आणि इतर मूल्यवर्धित सेवांसारख्या क्षेत्रांत अदानी ग्रूपबरोबर सहयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना प्रवासाचा अधिक सुसूत्र अनुभव देण्याचा आणि कंपनीच्या विकासाला चालना देण्याचा क्लियरट्रिपचा उद्देश आहे.

“फ्लिपकार्टबरोबर आमचे मजबुतीने विकसित होणारे नाते असून त्यात डेटा सेंटर, फुलफिलमेंट सेंटर आणि आता हवाई प्रवास अशा विविध पैलूंचा समावेश आहे,” असे अदानी ग्रूपचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, “देशांतर्गत विकसित झालेल्या कंपन्यांबरोबर अशा प्रकारच्या धोरणात्मक भागीदाऱ्या करण्यातूनच अखेर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल आणि आत्मनिर्भर भारत तयार होईल. आम्ही ज्या सुपरॲपच्या प्रवासावर निघालो आहोत, त्याचा क्लियरट्रिप प्लॅटफॉर्म हा अत्यावश्यक भाग बनणार आहे.”

या घडामोडीबद्दल बोलताना फ्लिपकार्ट ग्रूपचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “फ्लिपकार्ट ग्रूपमध्ये आम्ही ग्राहकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संधी देणे आणि त्यांना उत्तम अनुभव देणे यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पर्यटन व प्रवासाला पुढील काही महिन्यांत गती येईल, त्यावेळी ग्राहकांना सुलभ आणि लवचिक प्रवासानुभव देण्यासाठी क्लियरट्रिप वचनबद्ध राहील. अदानी समूहाबरोबरचे आमचे नाते आणखी बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि त्यांच्या देशातील प्रवासाशी संबंधित पायाभूत सुविधांचा वापर करून ग्राहकांना अधिकाधिक सेवा कशा देता येतील त्याचा शोध घेऊ.”

कस्टमरी क्लोजिंग कंडिशन्सच्या अधीन राहून हा व्यवहार नोव्हेंबर २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.